SSC-HSC Exam 2024 : दहावी, बारावीच्‍या परीक्षेला मिळणार अतिरिक्‍त 10 मिनिटे

आगामी दहावी, बारावीच्‍या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी दहा मिनिटांचा जादा वेळ मिळणार आहे.
SSC-HSC Exam 2024
SSC-HSC Exam 2024 esakal
Updated on

SSC-HSC Exam 2024 : आगामी दहावी, बारावीच्‍या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी दहा मिनिटांचा जादा वेळ मिळणार आहे. यापूर्वी लेखी परीक्षा सुरु होण्यापूर्वी ही वेळ दिली जात असली तरी यंदा मात्र पेपरच्‍या शेवटच्‍या वेळेत दहा मिनिटांची वाढ दिली जाईल.

त्‍यामुळे दोन तासांच्‍या पेपरसाठी दोन तास १० मिनिटे तर तीन तासांच्‍या पेपरसाठी विद्यार्थ्यांना तीन तास १० मिनिटांची वेळ मिळणार आहे. (student of SSC and HSC exam 2024 will get extra 10 minutes nashik news)

राज्‍य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यासंदर्भात निर्णय जारी केला आहे. विद्यार्थ्यांना प्रश्‍नपत्रिका वाचण्यासाठी, प्रश्‍नांचे आकलन होण्यासाठी परीक्षा दालनात प्रश्‍नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्‍या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर केले जात होते. परंतु प्रश्‍नपत्रिका मोबाईलवर तसेच इतर समाज माध्यमांतून व्‍हायरल झाल्‍याच्‍या काही घटना निदर्शनास आल्‍या होत्‍या.

त्‍यानंतर अतिरिक्‍त दहा मिनिटांची ही सवलत फेब्रुवारी-मार्च २०२३ च्‍या परीक्षेपासून रद्द झाली होती. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन तसेच विद्यार्थी, पालकांच्‍या मागणीचा विचार करून ही दहा मिनिटांची वेळ पुन्‍हा विद्यार्थ्यांना वाढवून देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

SSC-HSC Exam 2024
SSC-HSC Exam 2024 : दहावी-बारावीचे 2 फेब्रुवारीपासून प्रात्यक्षिक परिक्षा

मात्र ही वाढीव वेळ पेपर सुरु होण्यापूर्वी मिळणार नसून, पेपर संपण्याच्‍या वेळेत जादाची दहा मिनिटे मिळणार आहेत. त्‍यामुळे सकाळच्‍या सत्रातील पेपरमध्ये सकाळी अकराला तर दुपारच्‍या सत्रात दालनात दुपारी तीनला प्रश्‍नपत्रिकांचे वाटप केले जाईल. तत्‍पूर्वी विद्यार्थ्यांनी अनुक्रमे साडे दहा व दुपारी अडीच वाजता परीक्षा केंद्रावर उपस्‍थित राहाणे आवश्‍यक आहे.

नाशिक विभागात परीक्षेसाठी विद्यार्थी नोंदणी अशी :

जिल्‍हा बारावी दहावी

नाशिक ७८ हजार ४५० ९३ हजार ९९०

जळगाव ४८ हजार २३६ ५७ हजार ०५८

धुळे २४ हजार ३०५ २८ हजार ६४५

नंदुरबार १७ हजार ४२२ २० हजार ९६७

SSC-HSC Exam 2024
SSC-HSC Exam : खासगी विद्यार्थ्यांना दहावी-बारावीच्या परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी २० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.