Nashik News : ‘मॅडम आम्हाला सोडून जाऊ नका’ बदली झालेल्या मुख्याध्यापिकेला आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांची आर्त साद

student upset during principal transfer from ashram school nashik news
student upset during principal transfer from ashram school nashik newsesakal
Updated on

Nashik News : दोधेश्वर येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका शालिनी देवरे (पगार) यांनी उत्कृष्ट सेवा दिली. त्यांच्या पुढाकाराने इयत्ता दुसरीमध्ये ३४ विद्यार्थी होते. (student upset during principal transfer from ashram school nashik news)

त्यांच्या बदलीमुळे विद्यार्थी अक्षरशः रडले अन् ‘बाई आम्हाला सोडून जाऊ नका’, अशी आर्त हाक विद्यार्थ्यांनी दिली. भावनिक साद बघता देवरे यांचेही डोळे पाणावले अन् त्यांनीही अश्रूला वाट मोकळी करून दिली. दरम्यान, त्यांची नामपूर येथील तळवाडे-भामेर येथे बदली झाली आहे.

शालिनी देवरे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठीदेखील प्रामाणिक प्रयत्न केलेत. त्यांच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे आधारकार्ड, तसेच डीबीटीबाबत शंभर टक्के काम पूर्ण होते. याबरोबरच इयत्ता पहिली ते चौथी वर्गातील विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडण्यासाठीसुद्धा त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या सेवानिवृत्तीसाठी केवळ दोनच वर्ष बाकी आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

student upset during principal transfer from ashram school nashik news
Crop Insurance Scheme : एक रुपयात पीकविम्याचा सर्व्हर डाउन; शेवटचे 8 दिवस शिल्लक

त्यांची बदली होत असून, त्यांनी शासनाकडे अथवा वरिष्ठ कार्यालयाकडे विनंती केली असती, की माझ्या शासकीय सेवेची केवळ दोनच वर्षे सेवा बाकी आहेत. मला याच ठिकाणी काम करण्याची संधी देण्यात यावी; परंतु त्यांनी शासनाचा आदेश सर्वोच्च मानून बदलीच्या ठिकाणी रुजू झाल्या.

"प्रभारी मुख्याध्यापकपदाच्या कालावधीत वरिष्ठ कार्यालयातील सर्व अधिकारीवर्ग व कर्मचारीवृंद यांचे प्रत्येक वेळी अनमोल सहकार्य लाभले. मार्गदर्शन मिळाले, याबद्दल या सर्वांची मी कायमच ऋणी राहील. यापुढेही ज्ञानदनाचे काम करणार आहे." - शालिनी देवरे(पगार), शिक्षिका

student upset during principal transfer from ashram school nashik news
Ganeshotsav 2023 : गणेशोत्सव मंडळांसाठी खुशखबर! राज्य शासनाकडून लाखोंची पारितोषिके जिंकण्याची संधी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.