वयाच्या 19 व्या वर्षीच विद्यार्थी होताय कमावते!

विद्यार्थांचा पॉलिलीटेक्निकचा निकाल येणे अद्याप बाकी असताना त्यांच्या हातात नोकरीच्या नेमणुकीचे पत्र प्राप्त झाले आहे.
Employment
Employmentesakal
Updated on

येवला (जि. नाशिक) : कोपरगाव येथील संजीवनी के. बी. पी. पॉलिटेक्निकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंटतर्फे झालेल्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह अंतर्गत कोल्ब्रो ग्रुप या कंपनीने अंतिम वर्षातील १७ नवोदित अभियंत्यांची आकर्षक पगारावर निवड केली. कॅम्पस मुलाखतींचा निकाल कंपनीने नुकताच जाहिर केला.

या विद्यार्थांचा पॉलिलीटेक्निकचा निकाल येणे अद्याप बाकी असताना त्यांच्या हातात नोकरीच्या नेमणुकीचे पत्र प्राप्त झाले आहे. संजीवनीच्या प्रयत्नामुळे शेकडो विद्यार्थी वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी कमावते होत आहेत, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी दिली.

Employment
Airforce Agniveer : हवाई दलात 'अग्निवीर' होण्यासाठी द्यावी लागणार परीक्षा

कोल्ब्रो ग्रुप ही एक प्रकल्प व्यवस्थापन कंपनी असून, राज्यातील नगर परिषदा व महापालिकांसाठी जीआयएस आधारीत मालमत्ता कर मूल्यांकन सर्वेक्षण आणि मालमत्ता कर व्यवस्थापन प्रणालीवर काम करते. आगामी काळात अधिकचे अभियंते या कंपनीला लागणार आहेत.

कोल्ब्रो ग्रुपने निवडलेल्या नवोदित अभियंत्यांमध्ये मयूर पवार, शुभम दहिफळ, अदित्य राज, यशराज धनेधर, धीरज कुमार, मेघनाथ कुमार, अमित कुमार, सोहन कुमार, विशाल शर्मा, सोनू कुमार, सोनूकुमार ठाकूर, रितेशकुमार सिंघ, रवितोश कुमार, प्रथमेश घुगरकर, रोहीत घोगडे, अविष्कार गायकवाड आणि विकास मिंद यांचा समावेश आहे. त्यांच्या अंतिम परीक्षेचा निकाल हाती मिळताच ते सर्व सेवेत रुजू होणार आहेत.

Employment
१०वी आणि ITI उत्तीर्णांची naval dockyardमध्ये भरती

संजीवनी ग्रुपचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. अमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. प्राचार्य ए. आर. मिरीकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. आय. के. सय्यद, विभागप्रमुख प्रा. योगेश जगताप, प्रा. प्रताप आहेर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.