महाकरिअर पोर्टलवर भरोसा नाय! विद्यार्थ्यांची पाठ

mahacareer portal
mahacareer portalesakal
Updated on

नामपूर (जि.नाशिक) : शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरबाबत ऑनलाइन सखोल मार्गदर्शन करणाऱ्या ‘महाकरिअर पोर्टल’वर (‘Mahacareer Portal’) भरोसा नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. कोरोनाकाळात (corona virus) जिल्ह्यातील ९९ टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाइन मार्गदर्शनाकडे (online guidence) पाठ फिरविल्याचे निराशादायक चित्र विद्यार्थ्यांची शैक्षणिक उदासीनता अधोरेखित करणारे आहे. (Students-ignore-for-MahaCareer-portal-marathi-news)

महाकरिअर पोर्टलवर विद्यार्थ्यांचा भरोसा नाय!

आपले सामर्थ्य, विकासाच्या संधी, शैक्षणिक कामगिरी, कौटुंबिक पार्श्वभूमी, रोजगाराची निकड आदी बाबींचा सारासार विचार करून करिअरच्या उपलब्ध संधींमधील सर्वोत्तम मार्ग निवडीबाबत मार्गदर्शन करणे हा महाकरिअर मित्रचा मुख्य उद्देश आहे. नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक वाटचालीच्या सुरवातीस योग्य व वेळेवर मार्गदर्शन मिळवून देणे व त्याद्वारे एका दिशादर्शकाची भूमिका बजावणे यासाठी शिक्षण विभागाने पोर्टल कार्यान्वित केले आहे.

mahacareer portal
स्वतंत्र खोली नसलेले नागरिक होणार कोविड सेंटरमध्ये दाखल

विविध माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध

महाकरियर पोर्टलच्या माध्यमातून समुपदेशक विद्यार्थ्यांना त्यांच्या जवळच्या शिक्षण संस्थेबाबतची माहिती देण्यासाठी परिश्रम घेतात. यासाठी विविध शिक्षण संचालक, उच्च शिक्षण यांच्याशी समन्वय साधून विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशा शैक्षणिक संस्था, अभ्यासक्रम, पात्रता, पत्ता, संपर्क क्रमांक आदींची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. करिअरबाबत विद्यार्थ्याना मदत करण्यासाठी पोर्टल दीपस्तंभाची भूमिका निभावते. करिअर विषयक मार्गदर्शनासाठी, व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था यांची करिअर मार्गदर्शन, महाकरिअर मित्र हेल्पलाईन ८२७५१००००१ या सारख्या सुविधा शिक्षण विभागाने उपलब्ध करून दिल्या आहेत.

शिक्षण विभाग हतबल

सध्या राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये बंद आहेत. अशा वेळी राज्यातील विद्यार्थ्यांसाठी करिअरसंदर्भात मोफत मार्गदर्शन व समुपदेशन सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दूरध्वनीद्वारे व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचा फायदा घेऊन विद्यार्थ्यांनी योग्य करिअर निवडून भविष्य सुरक्षित करणे गरजेचे होते. राज्यातील किती टक्के विद्यार्थ्यांचा कोणत्या शाखेकडे कल आहे, याबाबत शिक्षण विभागाला अंदाज येऊन त्यावर अंमलबजावणी व उपाययोजना करणे सहज शक्य होते. परंतु विद्यार्थ्यांच्या करिअरबाबतच्या अनास्थेमुळे शिक्षण विभाग हतबल झाला आहे.

mahacareer portal
जून महिन्यात वैद्यकीय विभागात भरती! सहाशे पदे भरणार

शिक्षण विभागाकडून सूचना

प्रत्येक तालुक्यासाठी एक समुपदेशक याप्रमाणे राज्यात ४२५ समुपदेशक नेमण्यात आले आहेत. प्रत्येक तालुक्‍यात संपर्क अधिकारी, मुख्याध्यापक आणि एक साधन व्यक्ती यांची एक टीम स्थापन करून ते विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शन करीत असतात. विद्यार्थ्यांचे करिअर पोर्टल वापराचे प्रमाण वाढावे, यासाठी तालुकानिहाय समुपदेशक व तालुका समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार शाळांनी विद्यार्थ्यांसाठी करिअर पोर्टल व समुपदेशन सविधांबाबत ऑनलाइन कार्यशाळांचेही आयोजन करण्याबाबतच्या सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

★ राज्याची स्थिती

* एकूण विद्यार्थी : ४४ लाख ४३ हजार ४२४

* नोंदणी केलेले विद्यार्थी : ४ लाख ८२ हजार ८०२

★ तालुकानिहाय विद्यार्थी संख्या व कंसात लॉगीन केलेले विद्यार्थी संख्या अशी :

* मालेगाव - १४ हजार २२(१७)

* बागलाण - ११ हजार ७८७ (४०)

* निफाड - १९ हजार ७८० (३५५)

* दिंडोरी- ११ हजार ३४५ (४९)

* नांदगाव- ९ हजार ५५६ (५३)

* चांदवड - ९ हजार १२८ (२१)

* सिन्नर - १३ हजार ५५६ (१७१)

* येवला- ११ हजार २७६ (२९)

* कळवण- ६ हजार २३७ (५)

* देवळा - ४ हजार ९७५ (१७)

* नाशिक - ७ हजार ११३ (८२)

* त्र्यंबकेश्वर - २ हजार ३३७ (३)

* इगतपुरी - ९ हजार ८४७ (२०)

* पेठ - १ हजार ५५६ (२)

* सुरगाणा - ३ हजार ८०६ (२)

* नाशिक महापालिका १ - २७ हजार ५०९ (३८०)

* नाशिक महापालिका २ - १६ हजार ७१५ (३५७)

* मालेगाव महापालिका - २३ हजार ९५५ (४)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()