नाशिक : ‘सकाळ’ माध्यम समूह आयोजित ‘यिन नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत’ ‘यिन’ निवडणूक प्रक्रिया ९ जानेवारी २०२३ पासून सुरू होत आहे. या प्रक्रियेला जिल्हाभरातून शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, विद्यार्थी उमेदवारांचा प्रतिसाद वाढत आहे. जिल्हाभरातील ११५ महाविद्यालये या प्रक्रियेत सहभागी झाली आहेत. विद्यार्थ्यांमध्ये आकर्षण असलेली ही निवडणूक यंदा ऑफलाइन होत आहे. ( Students overwhelming response for YIN Election nashik news)
राज्यभरातील विविध महाविद्यालयांतील उमेदवार अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ‘यिन’ निवडणुकीत सहभागी होत आहेत. नाशिक जिल्ह्यातही प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या संपूर्ण प्रक्रियेत महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच विविध शाखांचे विभागप्रमुख विद्यार्थ्यांना ‘यिन’ निवडणुकीबद्दल मार्गदर्शन करत आहेत.
महाविद्यालयात पोस्टर, बॅनर आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून निवडणुकीची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’चे ‘यिन’ व्यासपीठ परिश्रम घेत आहे. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसित करताना त्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचे काम ‘सकाळ माध्यम समूहा’चे ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ अर्थात, (यिन) या व्यासपीठाद्वारे केले जात आहे.
उमेदवारी अर्जाची ५ जानेवारीपर्यंत संधी
पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रियेला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. या टप्प्यात निवडणूक होत असलेल्या महाविद्यालयातील इच्छुक उमेदवारांना त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ५ जानेवारीपर्यंत मुदत असणार आहे. प्राप्त अर्जांवर छाननी व अन्य प्रक्रिया पूर्ण करुन उमेदवारांची अंतिम तयार केली जाणार आहे.
निवडणूक आणि मतदान प्रक्रिया
- ॲपच्या सहाय्याने ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे.
- मतदान करण्याआधी ‘यिन’चे ॲप प्रत्येक मतदाराने मोबाईलमध्ये डाउनलोड करायचे आहे. तसेच मतदान करताना ॲपचे स्वतःचे प्रोफाईल दाखविणे आणि महाविद्यालयाचे आयडीकार्ड सादर करणे. हे दोन पुरावे दाखवून मतदान करता येऊ शकते.
- मतदान हे महाविद्यालयातच ‘सकाळ-यिन’च्या अधिकृत मतपत्रिकेद्वारे मतपेटीत सर्वांन पुढे गुप्तपणे टाकून केले जाईल. महाविद्यालयामध्ये आपल्या पसंतीच्या उमेदवाराला विद्यार्थी मतदान करतील.
- प्रत्येक महाविद्यालयातून प्राचार्यांच्या सहमतीने निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. तसेच कोअर टीमचे दोन सदस्य, ‘सकाळ’चे एक कर्मचारी या निवडणूक प्रक्रियेत देखरेख करतील.
- महत्त्वाचे : अधिक माहितीसाठी ‘यिन’चे विभागीय अधिकारी गणेश जगदाळे (९०७५०१७५०८) यांच्याशी संपर्क साधवा.
पहिली फेरी :
९ जानेवारी २०२३ (शहर)
१२ जानेवारी २०२३ (ग्रामीण)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.