Eye Infection : विद्यार्थ्यांना डोळे येण्याचा त्रास, शिक्षण विभाग सुस्त; आरोग्य विभाग सतर्क

Students suffering from eye infection problem in nashik
Students suffering from eye infection problem in nashiksakal
Updated on

Eye Infection : संततधार पावसामुळे ग्रामीण भागात साथरोगांचा प्रादुर्भाव वाढलेला असताना विद्यार्थ्यांमध्ये डोळे येण्याची साथ सुरू झाली आहे.

या विषयी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग अनभिज्ञ असून, त्यांनी शाळांना याबाबत कुठल्याही सूचना केलेल्या नाहीत. आरोग्य विभागाने सतर्कतेचा इशारा देत विद्यार्थ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. ()

ग्रामीण भागातील बहुतांश शाळांमधील विद्यार्थ्यांना सध्या सर्दी, खोकला, ताप येण्यासह डोळे येण्याचा त्रास सुरू झाला आहे. हा संसर्गजन्य आजार असल्याने एका विद्यार्थ्याला त्याची लागण झाल्यास इतर विद्यार्थीही बाधित होत असल्याचे दिसून येते. ज्या विद्यार्थ्याची प्रकृती ठीक नाही, त्यांनी शाळेत न येण्याचे आवाहन शिक्षक व मुख्याध्यापक करीत आहेत.

शाळा पातळीवर निर्णय घेतला जात असला, तरी प्राथमिक शिक्षण विभागाकडून यासंदर्भात लेखी सूचना अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे शिक्षक व मुख्याध्यापक अडचणीत सापडले आहेत. शिक्षण विभागाला याविषयी फारसे गांभीर्य नसल्याचे दिसून येते. आरोग्य विभागाने मात्र, गावातील आशा कर्मचारी, आरोग्यसेविकांना सूचना दिलेल्या आहेत.

डोळे आलेल्या विद्यार्थ्याचा डोळा व्यवस्थितरीत्या धुवून त्याला औषध दिले जाते. दोन ते तीन दिवसांची ही प्रक्रिया असल्याने या विद्यार्थ्याने शाळेत न जाता घरीच आराम करण्याचे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये डोळे येण्याचा संसर्ग वाढू नये म्हणून पिंपळगाव बसवंत येथील काही शाळांनी विद्यार्थ्यांना सुटी दिली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Students suffering from eye infection problem in nashik
Eye Infection : चाळीसगावकर डोळ्यांच्या साथीने बेजार! शालेय विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक लक्षणे; अशी घ्या काळजी...

"गावातील आशा कर्मचारी, आरोग्य केंद्रामार्फत उपचार करण्यात येत आहेत. डोळे स्वच्छ पाण्याने धुण्याच्या सूचना करण्यात येतात. डोळे आलेल्या विद्यार्थ्यांनी शाळेत न आल्यास संसर्ग थांबेल." - डॉ. हर्षल नेहते, माता व बालसंगोपन अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक

"आज कामानिमित्त मुंबईत असल्याने उद्या नाशिकला आल्यावर शिक्षण विभागामार्फत शाळांना सूचना केल्या जातील." - भगवान फुलारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी (जिल्हा परिषद, नाशिक)

प्राथमिक शाळा व विद्यार्थी संख्या

जिल्हा परिषद शाळा : ३ हजार २६३

विद्यार्थी संख्या : २ लाख ६५ हजार

शिक्षक संख्या : ११ हजार

Students suffering from eye infection problem in nashik
Eye Infection : डोळ्यांच्या साथीने लहान मुले, मोठी माणसे त्रस्त; साथ रोखण्यासाठी अशी घ्या काळजी...

खासगी शाळा : ६६३

विद्यार्थी संख्या : २ लाख ४१ हजार

शिक्षक संख्या : ६ हजार ७६३

जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा

प्राथमिक आरोग्य केंद्रे : १०६

प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे : ५९२

ग्रामीण रुग्णालये : २८

प्राथमिक आरोग्य पथके : ९

Students suffering from eye infection problem in nashik
Eye Infection : नेत्रविकार तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचे आवाहन! डोळे येण्याचे प्रमाण वाढले; अशी घ्या काळजी..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.