Subhash Desai | दाओसमधील करार ही निव्वळ धूळफेक : सुभाष देसाई

उद्योग महाराष्ट्रातील, करार मात्र स्वित्झर्लंडला जाऊन केले
Subhas desai
Subhas desaiesakal
Updated on

नाशिक : राज्यातील सरकार हे दिखाऊ सरकार आहे, दाओस (स्वित्झर्लंड) येथे कोट्यवधींचे करार झाल्याचा केवळ देखावा करण्यात येत असून, जनतेची धूळफेक करण्यात आली आहे.करार स्वित्झर्लंडला झाल्याचे दाखवले जात असले तरी बहुतांश उद्योग महाराष्ट्रातीलच आहे, ते करार मंत्रालयात बसूनही करता आले असते, असा दावा माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केला. (Subhash Desai statement trolling Davos agreement nashik news)

नाशिक पदवीधर मतदारसंघातील शिवसेना पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांच्या प्रचारार्थ झालेल्या नियोजन बैठकीत त्यांनी ही टीका केली.

श्री. देसाई यांनी विद्यमान सरकारचा ‘मिंधे सरकार’ असा उल्लेख करीत, दाओस येथे लाखो-कोटींचे करार झाल्याचा दावा हा राज्यातील नागरिकांच्या डोळ्यांत धूळफेक आहे. जे करार झाले ती विदेशी गुंतवणूक कमी आणि राज्यातील उद्योगसमूहांची अधिक आहे.

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

Subhas desai
Sant Nivruttinath Yatrotsav : तूंचि चराचरीं दिससी आम्हां!! काल्याच्या कीर्तनानंतर वारकऱ्यांचे प्रस्थान

हे सगळे करार मंत्रालयात बसूनही करता येणे शक्य होते. दाओसला जायची गरज काय होती? असा प्रश्न श्री. देसाई यांनी उपस्थित केला.

ते म्हणाले, ‘‘ज्या उद्योग समूहाशी करार झाले, त्यांची माहिती घेतली तर पुण्यातील बडवे इंजिनिअरिंग, जालना येथील राजोरी स्टील, मुंबईतील बाळासाहेब दराडे अशा अनेक महाराष्ट्रातीलच उद्योगसमूहांचा समावेश आहे. करारच करायचे होते, तर तिथे जायची काय गरज होती, मंत्रालयात बसूनही हे करार करता आले असते, असाही टोलाही त्यांनी लगावला.

Subhas desai
Nashik News: चोरीला गेलेला रस्ता पंधराव्या वित्त आयोगातील शिवरस्ता? रस्त्यावरून तक्रारदार अन ZPमध्ये जुंपली!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()