Nashik News : नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे पदाधिकारी सुभाष जांगडा यांनी आज नदी स्वच्छता व पाणी वाचवाचा संदेश देण्यासाठी नाशिक ते त्र्यंबकेश्वर ३१ किमी अंतर न थांबता ३ तास २६ मिनिटात केले पूर्ण केले.
आज पहाटे पाच वाजून ३० मिनिटांनी रामकुंड पंचवटी येथून नाशिक ते त्र्यंबकेश्वर धावण्यास त्यांनी सुरुवात केली.
या दरम्यान ते आपल्या सोबत गंगोत्री, यमुनोत्री, हरिद्वार व हिमालय कैलास मानस सरोवर व रामकुंड गोदावरीतील जल असलेला जलकुंभाने त्र्यंबकराजास जलाभिशेष केला. (Subhash Jangda ran from Nashik to Trimbakeshwar giving message of river cleanliness saving water Nashik News)
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
यावेळी त्र्यंबकेश्वर येथे नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, वरिष्ठ सल्लागार जयपाल शर्मा,राजेश इसरवाल, राजेश शर्मा, राजेंद्र साहानी, राजबाला शर्मा,गंगा जांगडा, रुपाली मोंढे, योगिता निकम,प्रणिता तुंगार यांनी उपस्थित राहून त्यांचा सत्कार केला.
नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे पदाधिकारी सुभाष जांगडा यांनी या अगोदर नाशिक ते शिर्डी धावत बेटी बचाव बेटी पढाव, झाडे लावा झाडे जगवा यासह विविध विषयांवर प्रबोधन केले आहे. आज ते नदी स्वच्छता व पाणी वाचवाचा संदेश देत नाशिक ते त्र्यंबकेश्वर धावले.
या दरम्यान ते आपल्या सोबत गंगोत्री, यमनोत्री, हरिद्वार, कैलास मानस सरोवर, गोदावरीचे तीर्थ घेऊन सकाळी रामकुंड येथून ५:३० वाजता सुरवात करून ८:५६ वाजता त्र्यंबकेशवर येथे त्र्यंबकराजास जलाभिषेक केला. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.