नाशिक : खासगी लॅबचालकांना डेंगीचा अहवाल कळविणे बंधनकारक

Dengue
Dengue sakal
Updated on

नाशिक : पावसाळ्यात डेंगी व चिकूनगुनियाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. जुलैमध्ये दोन्ही आजारांच्या रुग्णांची संख्या दोनशेने वाढली. ही आकडेवारी महापालिका रुग्णालयात असली, तरी खासगी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात डेंगीवर उपचार करणाऱ्यांची संख्या आहे. त्यामुळे खासगी लॅबचालकांना डेंगी (Dengue), चिकूनगुनियाच्या (Chikungunya) आजारांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला कळविणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला असून, यासंदर्भात आदेश काढले जाणार असल्याची माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.


खरी आकडेवारी स्पष्ट होण्यासाठी निर्णय

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शहर बेजार झाले. पहिल्या लाटेत ७६ हजार कोरोनाबाधित आढळले, तर दुसऱ्या लाटेत फेब्रुवारी ते जुलैपर्यंत दीड लाखाहून अधिक रुग्ण आढळले. जुलैमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी झाली. सध्या शंभरच्या आत रुग्णसंख्या पोचली असताना, डेंगी व चिकूनगुनियाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. जुलै महिन्यात डेंगीचे १५६, तर चिकूनगुनियाचे १३३ रुग्ण आढळले. गेल्या वर्षाच्या तुलनेत ही संख्या दुप्पट आहे. ही आकडेवारी महापालिकेच्या रुग्णालयांमधील अहवालावरून जाहीर करण्यात आली आहे. मात्र, खासगी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात डेंगी व चिकूनगुनियाचे रुग्ण उपचार घेत आहे. त्या रुग्णांचा अहवाल महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला प्राप्त होत नाही. त्यामुळे खासगी लॅबला डेंगीचा अहवाल पॉझिटिव्ह असल्यास महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला कळविणे बंधनकारक केले जाणार आहे. या माध्यमातून रुग्णांची नेमकी संख्या किती, याची माहिती मिळणार आहे.

Dengue
तिसरी लाट नाशिकच्या दारात; आयुक्त कैलास जाधव यांचे सूतोवाच

सातपूर, सिडकोत डेंगीचा कहर

महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या अहवालानुसार सातपूर व सिडकोत डेंगी, चिकूनगुनियाचे रुग्ण सर्वाधिक आढळले आहेत. त्यामुळे या भागात महापालिकेने वैद्यकीय पथकांची निर्मिती केली असून, रुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. डेंगीवर नियंत्रण आणण्यासाठी घर व परिसरातील नारळाच्या करवंड्या, टायरमध्ये साचणारे पावसाचे पाणी, फ्रीजमधील ट्रे, झाडांच्या कुंड्या आदी स्वच्छ करण्याचे आवाहन केले आहे. डेंगी नियंत्रणासाठी महापालिकेतर्फे शहरात जनजागरण मोहीम राबविली जाणार असल्याचे आयुक्त जाधव यांनी सांगितले.

(submission-of-dengue-chikungunya-report-of-private-laboratories-is-Mandatory)

Dengue
नाशिककरांसाठी गुड न्युज! एक दिवसाची पाणीकपात मागे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.