Nashik News: पांजरपोळ जागे संदर्भात अहवाल सादर करा; उदय सामंतांचे प्रशासकीय समिती नियुक्तीची सूचना

MLA Devyani Farande, entrepreneurs and officials present in the meeting with Industry Minister Uday Samant.
MLA Devyani Farande, entrepreneurs and officials present in the meeting with Industry Minister Uday Samant.esakal
Updated on

नाशिक : नाशिक शहराला लागून अतिरिक्त एमआयडीसीसाठी पांजरपोळची जागा संपादित करण्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त त्यांची ही सदस्य समिती नियुक्त करून १५ दिवसात अहवाल सादर करावा, असे निर्देश उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज (ता.२१) दिले. (Submit report regarding Panjarpol site Notice of appointment of Uday Samant administrative committee Nashik News)

चुंचाळे शिवारात पांजरापोळ संस्थेची ३२७ हेक्टर जमीन आहे. अंबड औद्योगिक वसाहतीला लागून सदरची जमीन असल्याने औद्योगिक वसाहतीसाठी ती जमीन आरक्षित करावे, अशी मागणी आहे. आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी यासाठी पुढाकार घेतला.

उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आज तातडीने विधान भवन परिसरात बैठक बोलविण्यात आली. बैठकीला महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन गवळी, प्रदीप पेशकार, नियमाचे धनंजय बेळे, आयमाचे राजेंद्र अहिरे, आशिष नहार आधी पदाधिकारी उपस्थित होते. आराम कर ही सामाजिक संस्था आहे.

हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

MLA Devyani Farande, entrepreneurs and officials present in the meeting with Industry Minister Uday Samant.
Nashik News : मालेगावला शिवसेनेकडून संजय राऊतांचा पुतळा दहन

गो- पालनांसाठी सदरची जागा त्यांनी घेतली आहे. सध्या या जागेवर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे. जागा संपादित करण्यासंदर्भात उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या समवेत बैठक झाली. पांजरपोळ संस्थेच्या ताब्यात असलेल्या या जागेत वृक्षसंपदा किती?, सदर जागेवर किती गाईंचे पालन पोषण होते? या संदर्भातील सविस्तर अहवाल पंधरा दिवसात सादर करण्याच्या सूचना उद्योग मंत्री सामंत यांनी दिल्या.

त्यासाठी जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांचे अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली असल्याची माहिती आमदार फरांदे यांनी दिली.

MLA Devyani Farande, entrepreneurs and officials present in the meeting with Industry Minister Uday Samant.
Employees Strike : सप्तश्रृंग गडावरील कर्मचाऱ्यांचे शुक्रवारपासून बेमुदत कामबंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.