रेडगाव खुर्द (जि. नाशिक) : चांदवड तालुक्यातील काळखोडे ते वाहेगावसाळ दरम्यान जलजीवन मिशन अंतर्गत चालू असलेल्या पाइपलाइनचे काम हे निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप वाहेगावसाळ ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी करत हे काम बंद पाडत याबाबत विभागाकडे तक्रारी केली.
यानंतर जिल्हा परिषद ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून संबंधित ठेकेदाराला पाण्यासाठी टाकलेले पाइप काढण्यास सांगितले. (Substandard work under Jaljeevan Mission Work stopped by Wahegavasal Gram Panchayat Nashik News)
राज्यातील प्रत्येक नागरिकांना त्याच्या घरात नळाने शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्वकांक्षी ‘हर घर जल’ योजना २०२४ पर्यंत पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागातर्फे निविदा प्रक्रिया राबवून ही कामे पूर्ण केली जात आहे.
कामाची संख्या व योजना लवकर पूर्ण व्हावी यासाठी सुशिक्षित बेरोजगार ठेकेदार यांना अनुभव नसतानाही कामे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु ही योजना दीर्घकालीन तसेच मोठ्या निधीची असल्याने या सुशिक्षित बेरोजगार ठेकेदारांना कोणताही अनुभव नसल्याने योजनेचा बट्ट्याबोळ होत असल्याचे प्रकार उघड झाला आहे.
चांदवड तालुक्यातील काळखोडे गावाला पिण्याच्या पाण्यासाठी वाहेगावसाळ वरून पाइपलाइनचे काम सुरू आहे. मात्र संबंधित ठेकेदाराने लवकर काम करण्यासाठी नियमांना फाटा देत रस्त्याच्या अगदी जवळून साइडपट्टी खोदत पाइप टाकले.
हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....
तर काही ठिकाणी डांबरी रस्ता जेसीबीने उखडून टाकला. पाइपलाइन रस्ता सोडून दोन ते तीन मीटर बाहेर करणे आवश्यक असते. मात्र ठेकेदाराने रस्त्याच्या लगतच खोदकाम केल्याने रहदारीस अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे परीसरातील नागरिक याबाबत संताप व्यक्त करत हे काम बंद पाडले.
या कामाच्या बाबतीत तक्रारी वाढल्यानंतर जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे अभियंता श्री. महाजन यांनी पाहणी करून तीव्र नाराजी व्यक्त केली. कामासाठी नव्वद लाख अंदाज पत्रकीय रक्कम मंजूर आहे.
"संबंधित ठेकेदाराने वाहेगावसाळ ते काळखोडे रस्त्याचे संपूर्ण नुकसान केले. साईडपट्टीतच पाइपलाइन खोदून रस्त्यावर माती टाकली. रस्ता उखडून ठेवला. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. रस्ता पुर्ववत करावा."- संदीप पवार, सरपंच वाहेगावसाळ
"हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पाहणी करून ठेकेदारास पाइपलाइन काढून घेण्यास सांगितले असून काम बंद करण्याची सूचना दिली आहे."
-वासंती बोरसे, सहाय्यक अभियंता, चांदवड
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.