नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुर्गम भागातील नानाफरारीचा पाडा डोंगरपाडा आता सोमनाथनगर म्हणून ओळखले जाते. एक हजाराच्या आसपास लोकसंख्या असलेल्या पाड्यावरील अडीच फूट उंची असलेल्या मोहन बेंडकुळे या तरुणाने पिण्याच्या पाण्यासाठी वीस वर्षे लढा दिला. त्याच्या लढ्याला यश आले असून धरणातून पाणी पाड्यांवर पोचणार आहे. जलजीवन मिशनची ऐंशी लाखांची पाणी योजना मंजूर झाली. योजनेचे पाणी हवालदारनगर, शिवाजीनगर, डोंगरपाडाला मिळेल. (Success in Mohan bendkules 20 year fight for water Scheme from Dongarpadyas Dam Nashik Latest Marathi News)
मोहन लहानपणापासून स्थानिक महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी चार किलोमीटर चालावे लागत असल्याचे रोज पाहायचा. पिण्यासाठी पाण्यासाठी गावात विहीर नव्हती. पाण्याच्या टाकीसाठी त्याने स्वतःची जागा दिली. मोहन ग्रामपंचायत सदस्य होता. त्याचा पुतण्या भगवान बेंडकुळे यांना सरपंच म्हणून निवडून आणले. उपसरपंच तुळशीदास बेंडकुळे, सदस्य संजय बेंडकुळे, मनोहर बेंडकुळे यांच्या सहकाऱ्याने त्याने गावात पिण्याचे पाणी आणले. त्यासाठी तो थेट मंत्रालयात तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री रणजित कांबळे यांना भेटला. दरम्यान, मोहनने ग्रामपंचायतच्या माध्यमातून सौर ऊर्जा मंजूर करुण घेतली. मोहनने शेती, जनावरे, वन्य प्राण्यांसाठी पाणी मिळावे म्हणून स्वतःची पाच एकर जागा गावतळ्यासाठी दिली आहे.
दहावीपर्यंत त्याने शिक्षण घेतले आहे. दरम्यानच्या काळात त्याच्या कलागुणांना व्यासपीठ मिळाले. पाच वर्षे पुण्यातील दत्तोबा तांबे यांच्या तमाशा फडात तो विनोदी कलाकार म्हणून काम करू लागला. २००४ मध्ये मोहनचा शीतलशी विवाह झाला. या दाम्पत्याला दोन मुलगे आणि एक मुलगी आहे. आता मोहन पाड्याच्या विकासाठी झटतोय. गावात शेती करतोय.
"पिण्याच्या पाण्यासाठी वीस वर्षांपासून केलेल्या संघर्षाला आता यश आले. गावातील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी होणारी कसरत थांबणार आहे. पाणी योजनेचा फायदा तीन पाड्यांना होणार असून आमदार हिरामण खोसकर यांनी मदत केली. आता पाड्याला गावठाण मिळावे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत." - मोहन बेंडकुळे (कलावंत)
"मोहनने पाड्यासाठी पिण्याचे पाणी मिळावे यासाठी मोठे प्रयत्न केले. पाणी योजनेचे काम पूर्ण झाले आहे. कश्यपी धरणातून पाइपलाइनमधून पाणी गावातील विहिरीत येईल."
- भगवान बेंडकुळे (सरपंच)
"मोहन आदिवासी पाड्यावरील कला-परंपरा तो जपत आहे. आदिवासींची कला समाजासमोर आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याला त्यासाठी गावाचे पूर्ण सहकार्य मिळते."
-मनोहर बेंडकुळे (शेतकरी)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.