Nashik News : इगतपुरीतील ज्येष्ठांच्या लढ्याला यश; काही काळ गोंधळ उडाल्यानंतर उपोषण स्थगित

Police Inspector Raju Surve breaking the hunger strike by giving lemonade to the Citizen Awareness Committee.
Police Inspector Raju Surve breaking the hunger strike by giving lemonade to the Citizen Awareness Committee.esakal
Updated on

Nashik News : शहरातील नागरिकांना मुलभूत सुविधा मिळाव्या या मागणीसाठी येथील जागृत नागरिक समितीच्या ज्येष्ठ नागरिकांनी सुरू केलेले उपोषण लेखी आश्वासनानंतर मंगळवारी (ता.१८) लिंबू पाणी देत सोडविण्यात आले.

पालिकेने तत्काळ दखल घेत मागण्या मान्य केल्या, मात्र तीन नागरिकांचे बळी घेणारा महामार्ग दुरूस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग प्रतिसाद देत नसल्याने उपोषणस्थळी काह काळ गोंधळ निर्माण झाला होता. (Success in struggle of seniors in Igatpuri hunger strike was called off after period of commotion Nashik News)

इगतपुरी नगरपरिषदेच्या कार्यालयाबाहेर समितीचे ज्येष्ठ नागरिक पुरणचंद लुणावत, किरण फलटणकर, अजित पारख, योगेश चांदवडकर, विलास कदम यांनी सोमवारी (ता.१७) बेमुदत उपोषणाला सुरुवात केली होती.

मंगळवारी रात्री या उपोषणात सहभागी असलेले ज्येष्ठ नागरिक अजित पारख व विलास कदम यांची प्रकृती खालवल्याने त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुख्याधिकारी पंकज गोसावी यांनी सोमवारीच वाढ करण्यात आलेली घरपट्टी व नळपट्टी बिल कमी केले.

शहरांतर्गत रस्ते तातडीने दुरुस्त करण्यात येतील असे लेखी आश्वासन देत मागण्या मान्य केल्या होत्या. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारींकडून प्रतिसाद मिळत नसल्याने शहरातील नागरिकांनी मंगळवारी उपोषणस्थळी घोषणाबाजी केल्याने वातावरण तापले होते.

उपोषणाची पोलिस निरीक्षक राजू सुर्वे व मुख्याधिकारी पंकज गोसावी यांनी दखल घेत जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांच्याशी संपर्क साधून संबधित सार्वजनिक बांधकाम अधिकारी उदय पालवे व नितीन घोडके यांना उपोषणस्थळी पाचारण केले.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Police Inspector Raju Surve breaking the hunger strike by giving lemonade to the Citizen Awareness Committee.
Bhairavanath Maharaj Yatraotsav : बोल भैरोबा की जय..! चांदोरीस रथोत्सव, हजारांवर भाविकांची उपस्थिती

शहरातील जुना मुंबई आग्रा महामार्ग तातडीने दुरुस्त करावा अशी मागणी केली. या रस्त्यांवरील खड्डयांमुळे झालेल्या अपघातात शहरातील तीन नागरिकांचा मृत्यू झाला होता. मात्र संबंधित अधिकारींनी रस्त्यांबाबत उडवाउडवीची उत्तरे दिल्याने उपोषणस्थळी पुन्हा मोठा गोंधळ निर्माण झाला होता.

संबधित अधिकारी योग्य उत्तर देत नसल्याने उपोषणकर्त्यांनी उपोषण सुरूच ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला होता. मात्र श्री. सुर्वे यांनी मध्यस्थी केली. संबधित बांधकाम अभियंत्यांनी शहरातील रस्ते तातडीने बुजवून २२ एप्रिलला रस्ता गुणवत्ता टीमकडुन पाहणी करून पावसाळ्याआधी रस्ता तयार करू असे लेखी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.

पोलिस निरीक्षक राजू सुर्वे, मुख्याधिकारी पंकज गोसावी, उदय पालवे, नितीन घोडके यांच्या हस्ते लिंबु पाणी देऊन उपोषण सोडवण्यात आले. या उपोषणाला सर्व पक्षीयांसह शहरातील सर्व नागरिकांसह महिलांनी पाठिंबा दर्शवला होता.

Police Inspector Raju Surve breaking the hunger strike by giving lemonade to the Citizen Awareness Committee.
Rajerghujibaba Yatra : येवल्याच्या संस्थापकाची यात्रा सुरू! गुरूवारी छबिना मिरवणूक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.