मालेगाव (जि. नाशिक) : येथील समाजश्री प्रशांतदादा हिरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या (Pharmacy) चार विद्यार्थ्यांनी नायपर २०२२ (NIPER 2022) या परीक्षेत यश संपादन केले. (Success of 4 students of Malegaon in NIPER 2022 examination Nashik News)
मोहाली, चंदीगड येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मस्युटीकल एज्युकेशन रिसर्च (नायपर) (National Institute of Pharmaceutical Education Research) संस्थेच्या वतीने औषध निर्माणशास्त्र विषयात घेतल्या जाणाऱ्या देशपातळीवरील पदव्युत्तर परीक्षेत महाविद्यालयाच्या ऋषिकेश शेवाळे याने देशात १५४ वा क्रमांक पटकावून विद्यालयाचा नावलौकिक वाढविला. शुभांगी नलावडे, मयूर मर्कांड व क्षितिज वाळके ह्या विद्यार्थ्यांनी औषधनिर्माणशास्त्रात पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या परीक्षेत यश मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य एस. आर. तांबे, प्रा. सुनील महाजन आदींसह शिक्षकांनी अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.