Success Story : अधिकाऱ्यांचे गाव अशी ओळख असलेल्‍या गावाचा 'तो' झाला लेफ्टनंट..!

Aakash Kakad, who joined national service as a lieutenant, along with his family.
Aakash Kakad, who joined national service as a lieutenant, along with his family. esakal
Updated on

Success Story : अधिकाऱ्यांचे गाव अशी अनोखी ओळख असलेल्‍या मखमलाबाद गावाच्‍या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला गेला आहे. येथील आकाश विलास काकड या होतकरू युवकाने डेहराडून येथील इंडियन मिलिटरी ॲकॅडमी येथून आपले खडतर प्रशिक्षण पूर्ण केले आहे.

शनिवारी (ता. १०) झालेल्‍या दीक्षांत सोहळ्यानंतर आता तो भारतीय लष्करात लेफ्टनंट पदावर अधिकारी पदावरून देशसेवेसाठी सज्‍ज झाला आहे. (success story Akash Kakad become Indian Army as an officer in rank of lieutenant nashik news)

लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या उपस्थित डेहराडून येथील आयएमए येथे पासिंग आउट परेडचा सोहळा पार पडला. आकाशचे शालेय शिक्षण शहरातील स्वामिनारायण शाळेतून तर महाविद्यालयीन शिक्षण केटीएचएम महाविद्यालयातून झाले. लहानपणापासूनच त्याने लष्करात अधिकारी होण्याचे ध्येय निश्चित केले होते.

त्‍या दृष्टिकोनातून तयारी करताना दहावीला असताना त्‍याने छत्रपती संभाजीनगर येथील एसपीआय संस्थेत प्रवेशासाठी प्रयत्न केले होते. मात्र तेथे त्याला अपयश आले. त्यानंतर त्याने सुदर्शन ॲकॅडमी येथे हर्षल आहेरराव यांच्या मार्गदर्शनाखाली एनडीए प्रवेश परीक्षा आणि एसएसबी मुलाखतीची तयारी सुरु केली. यावेळी आकाशने मागील अपयशाची भर काढताना ‘एनडीए’ च्या गुणवत्ता यादीत देशात ३७ वा क्रमांक पटकावला होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Aakash Kakad, who joined national service as a lieutenant, along with his family.
Parachute Coconut Oil Success Story : पॅराशूट खोबरेल तेलाचा सर्वात मोठा ब्रँड बनाण्यामागची गोष्ट

'एनडीए'च्या तीन वर्षांच्या प्रशिक्षणातदेखील आकाशने नेत्रदीपक कामगिरी केली. ‘एनडीए’ च्या प्रशिक्षणानंतर आकाश एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी आयएमए येथे दाखल झाला होता. येथून अधिकारी झाल्यानंतर आकाश त्याच्या आवडीच्या जाट रेजिमेंटमध्ये दाखल झाला असून त्याची हिमाचल प्रदेश येथील धर्मशाळा येथे नियुक्ती झाली आहे.

शेतकरी कुटुंबातून भरारी

आकाश शेतकरी कुटुंबातील युवक असून त्याची आई कुसुम, वडील विलास, आजी गंगूबाई आणि आजोबा दत्तात्रेय काकड हे सर्व शेती व्यवसायात आहेत. त्याच्या दोन बहिणी शिक्षण घेत असून, लहान भाऊदेखील आकाश प्रमाणेच एनडीएची तयारी करतो आहे.

"सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील आकाशने आपल्या मेहनतीच्या जोरावर भारतीय लष्करात अधिकारीपद पटकावले आहे. त्याने मखमालाबादसोबतच नाशिक आणि राज्‍याचे नाव राष्ट्रीय स्‍तरावर उंचावले आहे." - हर्षल आहेरराव, सुदर्शन ॲकॅडमी, नाशिक.

Aakash Kakad, who joined national service as a lieutenant, along with his family.
Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.