Success Story : कमी उंचीचा अडसर झुगारून तपानंतर यशाला गवसणी! मेहनतीने पोलीस होण्याचे स्वप्न केले पूर्ण

Anees Shaikh
Anees Shaikhesakal
Updated on

Success Story : मनात जिद्द आणि मेहनत घेण्याची इच्छाशक्ती असेल, तर कुठलेही काम अशक्य नसते. तब्बल १२ वर्ष पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकाचे स्वप्न अखेर सत्यात उतरले आहे. विशेष म्हणजे, पोलीस शिपाईपदाला आवश्यक असणारी शारीरिक उंची भरत नसतानाही येथील युवकाने मेहनतीने मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई होण्याचा मान पटकावला आहे. (Success Story anees shaikh He fulfilled his dream of becoming policeman through hard work nashik news)

नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीमध्ये येथील अनिस असलम शेख या तरुणाची मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाईपदासाठी निवड होताच त्याच्यासह कुटूंबियांनी व मित्र परिवाराने एकच जल्लोष केला. अनिसचे वडील हे टायर पंक्चरचे दुकान चालवतात.

आई गृहिणी आहे, तर मोठा भाऊ तौसिफ हादेखील २००९ पासून मुंबई पोलीस दलात कार्यरत आहे. अनिसने पोलीस भरतीसाठी मोठे कष्ट घेतले आहेत. २०११ मध्ये पहिल्यांदा शारीरिक उंची कमी भरल्याने तो अपात्र ठरला.

मात्र, हार न मानता तब्बल दोन वर्ष मेहनत घेऊन सायकलिंग, दोर उडी असे विविध व्यायाम प्रकार करत उंची वाढविण्यात यश मिळविले. तरीदेखील अपयश पिच्छा सोडत नव्हते. २०१३मध्ये तो भरतीसाठी पात्र ठरला; परंतु लेखी परीक्षेत अपयश आले.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Anees Shaikh
Success Story : तब्बल 11 वेळा अपयशानंतर यश!

त्यानंतरही सलग २०१३ ते २०२० पर्यंत प्रयत्न केले. पण, अवघ्या दोन- तीन गुणांनी यश हुलकावणी देत होते. अखेर २०२०मध्ये वयोमर्यादा संपली व पुन्हा नजरेसमोर काळोख तयार झाला.

परंतु, कोरोना आजाराने जसे अनेकांचे नुकसान केले, तसे ते काहींना फायदेशीरही ठरले. शासनाने वयोमर्यादा वाढवून दिल्याने अनिसला वाढीव संधी मिळाली. ‘अभी नहीं, तो कभी नहीं’ असा विचार करून त्याने पुन्हा एकदा भरतीची तयारी सुरु केली. अखेर त्याच्या मेहनतीला फळ मिळाले.

दरम्यान, घरात हातभार लागावा यासाठी अनिस २०११पासून हिंदुस्थान ऐरोनोटिक्स लिमिटेड (एचएएल) कंपनीत कंत्राटी पद्धतीने सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करत होता. वेळ मिळेल तसा मैदानी आणि लेखीचा सराव सुरू ठेवला.

अनिसचे ओझरच्या नागरिकांनी, तसेच सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी, ज्ञानेश्‍वरी अभ्यासिकेतील सहकारी मित्रांनी व निफाड भाजपा विधानसभा प्रमुख यतीन कदम यांनीही शुभेच्छा देत कौतुक केले.

"अनेकांचे मार्गदर्शन व आई-वडिलांच्या, कुटुंबातील सदस्यांच्या आशीर्वादाने हे यश मिळाले आहे. मी त्यांच्या कायमच ऋणात राहू इच्छितो. माझे शालेय व महाविद्यालयीन शिक्षक व माझे सहकारी मित्रांनी दिलेल्या पाठबळामुळे मला हे यश प्राप्त करता आले. माझ्यासारख्याच अन्य उमेदवारांनाही मी तयारीत सातत्य व जिद्दीने मेहनत करण्याचा सल्ला देईल. आपण स्वतःच स्वतःचे प्रेरणादायी व्हा, हेच मी नेहमी सांगेल." -अनिस शेख, मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई

Anees Shaikh
Success Story : अपंगत्वावर मात करत योगेश युनियन बँकेत बनला अधिकारी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.