Success Story: रात्रीचा दिवस करत केली अंध वडिलांची स्वप्नपूर्ती! राजापूरचा योगेश्वर MPSCमध्ये राज्यात 15वा

yogeshwar vinchu
yogeshwar vinchuesakal
Updated on

Success Story : काबिल बनो, कामयाबी झक मारकर पीछे भागेगी... असा थ्री इडियट्स चित्रपटात डायलॉग आहे. या उक्तीला सार्थ ठरवत आपल्या अंध वडिलांनी जन्माला येतानाच मुलगा क्लास वन अधिकारी बनावा हे पाहिलेले स्वप्न राजापूरच्या योगेश्वर विंचू याने सत्यात उतरवले आहे.

वडिलांनी केलेले कष्ट आणि पाहिलेले स्वप्न हेच आपले अंतिम ध्येय आहे,या एका विचारानेच रात्रीचा दिवस करून योगेश्वरने स्वप्नपूर्ती करत राज्यात टॉपर येण्याचा पराक्रम केला आहे. (Success Story blind fathers dream come true Yogeshwar of Rajapur 15th in state in MPSC nashik news)

राजापूर येथील जिद्दी बापाच्या जिद्दी मुलाची ही कहाणी आहे. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून सेवानिवृत्त झालेले अशोक विंचू तसे संपूर्ण तालुक्याला परिचित आहे. तरुणपणातच अंधत्व येऊनही त्यांनी आयुष्यभर आपल्या बौद्धिक कौशल्यावर विद्यार्थी घडविले.

सोबतच आपली मुले घडवण्यात त्यांनी कुठलीही उणीव ठेवलेली नाही. मुलांनी स्पर्धा परीक्षातून क्लासवन अधिकारी व्हावे ही मुलाच्या जन्मासोबत त्यांनी इच्छा बाळगली अन ती पूर्ण करण्यासाठी मुलांना धडे दिले.

किंबहुना पहिलीपासून ते स्पर्धा परीक्षेतील यशापर्यंत त्यांनी केलेले मार्गदर्शन, त्यांची शिस्त आणि मुलांना दाखविलेली दिशा हेच पैलू महत्त्वपूर्ण ठरले आहे. आई-वडिलांची आपल्याला स्वप्नपूर्ती करायचीच आहे ही महत्वाकांक्षा देखील योगेश्वरने सत्यात उतरवीत तरुणांपुढे आदर्श उभा केला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (एमपीएससी) पार पडलेल्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा या परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे. त्यात योगेश्वर अशोक विंचू राज्यात पंधरावा आला आहे.

विशेष म्हणजे एनटी. डी प्रवर्गातून तो राज्यात प्रथम आला आहे. गुणवत्ता यादीनुसार त्याची सहाय्यक कार्यकारी अभियंता ( राजपत्रित, वर्ग-१) या पदावर जलसंपदा विभागात निवड होणार आहे. पहिल्याच प्रयत्नात तो लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाला असून सध्या तो सार्वजनिक बांधकाम विभाग या विभागात सहाय्यक अभियंता (वर्ग-२) या पदावर कार्यरत आहे.

मात्र, प्रबळ इच्छाशक्ती व्यक्तीला स्वस्थ बसू देत नाही याप्रमाणे नोकरी मिळूनही आपल्याला क्लासवन पदापर्यंत झेप घ्यायचीच आहे, हे ठरवून त्याने लगेचच दुसरीही परीक्षा दिली आणि यश मिळविले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

yogeshwar vinchu
Success Story: प्रत्येक वस्तू विकता आली पाहिजे, कंपनी सोडली आणि भंगार विकून मित्रांनी कमावले 200 कोटी

योगेश्वरचे प्राथमिक शिक्षण राजापूरच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. त्याचे पदवीचे शिक्षण शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथून २०१९ मध्ये स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतून पूर्ण झाले. पुढे त्याने गेट या परीक्षेतून भारतातून ७९० क्रमांक घेऊन पदव्युत्तर शिक्षणासाठी आयआयटी मुंबई या संस्थेमध्ये प्रवेश मिळविला.

योगेश्वरच्या यशामध्ये त्याच्या आई-वडिलांचा व नातेवाइकांचा खूप मोठा वाटा आहे. त्याच्या वडिलांनी बालपणापासूनच त्याच्या अभ्यासावर खूप लक्ष दिल्यामुळेच तो हे मोठे यश संपादन करू शकला.

योगेश्वरच्या वडिलांची निवड देखील शासकीय पदविका महाविद्यालय नाशिक येथे स्थापत्य अभियांत्रिकी शाखेत निवड झाली होती, परंतु दृष्टी अतिशय कमी झाल्यामुळे त्यांचे अधिकारी बनवण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे त्याच्या वडिलांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न त्यांचा मुलगा योगेश्वरने आज पूर्ण केले आहे.

योगेश्वर हा तालुक्यातील राजापूर गावातील पहिलाच राजपत्रित (वर्ग -१) अधिकारी होणार आहे. त्यामुळे गावामध्ये तसेच तालुक्यात सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.

"आई व वडील दोघेही शिक्षक असल्याने घरात पहिल्यापासून शैक्षणिक वातावरण व शिस्तही होती. वडिलांनी आमच्या अभ्यासावर विशेष लक्ष देत क्लास वन होण्याची जिद्द मनात निर्माण केली. आई-वडिलांची सुरू असलेली धडपड अभ्यासासाठी बळ देत गेली. अभ्यासाचे नियोजन व परिपूर्ण तयारीमुळे हे यश मिळू शकले." - योगेश्वर विंचू, सहाय्यक अभियंता, येवला.

yogeshwar vinchu
Business Success Story : श्रीमंतांच्या स्टारबक्सचा मालक चक्क एकेकाळी रक्तदान करून पैसे जमवायचा !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.