Success Story : बापाच्या कष्टाच्या घामाला सुगंध आणण्याचे काम समाजातील अनेक तरुण- तरुणी करतात. अशी सर्व लेकरे इतरांना आदर्श ठरतात. वाढत्या बेरोजगारीत राज्य सरकारने केलेल्या पोलिस भरतीत अनेकांना नोकरीची संधी मिळाली आहे.
यात मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मुला - मुलींनी यश मिळवत 'खाकी वर्दी' मिळविल्याने सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून भरती नसल्याने अनेक उच्चशिक्षित युवा मंडळी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेंची तयारी करत असताना मुंबई पोलिस व राज्यातील विविध जिल्ह्यांतील पोलिस भरतीसाठी यशस्वी झाले. (Success Story dream of khaki uniform fulfilled by farmers boys and girls 40 people from Malegaon taluka in police force nashik news)
पोलिस भरतीत मालेगाव तालुक्यातील एकाच वेळी चाळीस जण पोलिस म्हणून निवड झाली आहे. यामध्ये जवळपास सर्वच भरती झालेले उमेदवार ग्रामीण भागातील असून यात ८ मुली २२ मुले तर १० सैन्य दलातील निवृत्त जवान यांचा समावेश आहे.
निवड झालेले सर्वांमध्ये मजूर, रिक्षाचालक, शेतकरी अशा बापाच्या लेक-लेकींचा सहभाग असून एकाच वेळी दोन माजी सैनिक, एकाच गावातील तीन मुलींचा पोलिस दलातील समावेश ही गौरवास्पद बाब आहे. यामध्ये एक आई वडील यांचे छत्र हरपलेल्या उमेदवाराचे यश इतरांसाठी प्रेरक आहे.
गाव खेड्यातून आलेल्या या सर्वांच्या कुटुंबीय व मित्र परिवाराने आनंद व्यक्त केला आहे. माजी सैनिक वगळता राजे संभाजी पोलिस ॲकॅडमीच्या माध्यमातून तरुण, तरुणी पोलिस दलात सहभागी झाले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रा. निवृत्ती कोते, प्रा.राकेश पवार, प्रा. प्रवीण पाटील यांचे योग्य मार्गदर्शन लाभले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
पोलिस दलात निवड झालेले पोलिस मुली- मुले -
रूपाली सोनवणे (द्याने), प्रेरणा पाटील, हिमानी बोरसे, हर्षदा दुकळे (जळगाव निं), मयूरी अहिरे, नीता बच्छाव (सोनज), ज्योती कोरे (जळगाव निं), उज्वला काळे (जळगाव निं), विजय पिंजन (शेंदुर्णी), मयूर पाटील (चिंचावड ), सुनील केदारे (कुकाणे), धर्मनाथ भामरे (पोहाणे), शेतीसागर हारपळे (येसगाव बुद्रूक),
अमोल भामरे (जळगाव गा), नंदूकुमार चिकणे (देवारपाडे), अंबादास सूर्यवंशी (रावळगाव), अमोल पवार (वऱ्हाणे ), किरण बागूल (पोहाणे), राहुल म्हस्के (देवारपाडे), प्रविण मुलमुले (देवारपाडे), शुभम पाटील, हर्षल गढरी, अक्षय वाघ, सागर सूर्यवंशी, विशाल अहिरे, नीलेश जाधव.
माजी सैनिक : अण्णा पवार, संदीप बोरसे, प्रवीण बच्छाव, प्रकाश चव्हाण, विजय चव्हाण, योगेश ठाकरे, दशरथ पवार, समाधान शेवाळे, मोहन शेवाळे
"वडिलांनी सातत्याने कष्ट करून आम्हाला शिकवले. वाढत्या स्पर्धेत रिक्षालाही धंदा नाही अशा संघर्षमय परिस्थितीत सलग तीन वर्षांपासून आम्ही मैत्रिणी प्रयत्न करत यशस्वी झालो. आता एवढ्यावर न थांबता पुढील ध्येय गाठण्यासाठी सज्ज आहोत."- रूपाली सोनवणे.
"मुळात पोलिस दलातील भरती होणे सहज व सोपे नाही. ग्रामीण भागातील पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या मुलींनी सिद्ध केले की, 'हम भी कुछ कम नही'. यातील सर्वांनी खडतर मेहनत घेत अभ्यास केल्याने हे यश प्राप्त केले आहे."
- प्रा.निवृत्ती कोते, संचालक, राजे संभाजी पोलिस ॲकॅडमी, मालेगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.