Success Story : स्वत: शेतमजूरी करत अश्‍विनी पोलिस दलात!

Ashwini Gangurde
Ashwini Gangurdeesakal
Updated on

Success Story : स्वतः शेतमजुरी करून शिक्षण घेणाऱ्या अश्‍विनी नाना गांगुर्डे यांची मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे. इयत्ता दहावीत शिकत असतानापासूनच आई-वडिलांसोबत स्वत:ही शेतमजूरी करत अश्‍विनी यांनी कमकुवत आर्थिक परिस्थितीत कुटुंबाला हातभार लावला आहे. (Success Story farm laborer Ashwini joins mumbai police force nashik news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Ashwini Gangurde
Success Story: ट्रक चालकाची मुलगी खाकी वर्दीत! दारणा सांगवी ग्राम पंचायततर्फे साक्षी फड यांचा सत्कार

गांगुर्डे कुटुंबिय भूमिहीन असल्याने अश्‍विनी यांचे वडील सुरवातीपासून शेतमजुरीवरच उदरनिर्वाह करत आहे. वडील नाना गांगुर्डे यांच्यासह आई सत्यभामा गांगुर्डे व भाऊ सागर गांगुर्डे हेदेखील शेतमजुरीच करतात.

शेतमजुरी करतानाच अश्‍विनी यांनी धावण्याचाही सराव केला. पोलीस दलात नोकरी करण्याची सुरवातीपासूनच आवड असल्याने त्यांनी बारावीनंतर शिर्डी येथील श्री साई निर्माण करिअर अकॅडमीत प्रवेश घेत, हे यश मिळविले आहे.

त्यांना प्रमोद कदम यांचे मार्गदर्शन लाभले. या निवडीबद्दल सरपंच आनंदा भंडारे, जाधव पतसंस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव, सोसायटीचे अध्यक्ष रमेशराव उगले, मोगल पतसंस्थेचे अध्यक्ष अशोकराव भंडारे, शिवसेना शहराध्यक्ष विश्‍वास भंडारे, अतुल भंडारे, राजेंद्र वडघुले, निलेश उगले, संभाजी सुर्वे, रामेश्‍वर काठे, शिक्षक भारत मोगल आदींसह कसबे सुकेणे व परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Ashwini Gangurde
Success Story: शेतकऱ्यांच्या पोरांकडून 'खाकी वर्दी'चे स्वप्न पूर्ण! मालेगाव तालुक्यातील 40 जण पोलिस दलात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()