Success Story: डुबेरेतील शेतकरी कन्या वर्षाचा लंडनमध्ये MS पदवीने सन्मान

While honoring Varsha Waje at the University of Greenwich
While honoring Varsha Waje at the University of Greenwichesakal
Updated on

Success Story : येथील शेतकरी लक्ष्मण वाजे यांची कन्या वर्षा वाजे हिला लंडनमधील ग्रीनविच युनिव्हर्सिटीमध्ये आयटी क्षेत्रातील एमएस पदवीने नुकतेच सन्मानित करण्यात आले.

डुबेरेचे नाव लंडनपर्यंत नेणाऱ्या वर्षावर गाव व पंचक्रोशीतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. (Success Story Farmers Daughter varsha from dubere Honored with MS Degree in London nashik news)

वर्षा सोबत आई-वडील लक्ष्मण वाजे व परिवार विमानतळावरील शिक्षणासाठी जातानाचा क्षण
वर्षा सोबत आई-वडील लक्ष्मण वाजे व परिवार विमानतळावरील शिक्षणासाठी जातानाचा क्षणesakal
While honoring Varsha Waje at the University of Greenwich
Success Story : यशाची हॅट्‌ट्रिक करत अखेर स्वप्नील पवार झाले ‘आयएएस’

लक्ष्मण वाजे शेती करतात. त्यामुळे शिक्षण क्षेत्राशी त्यांचा जास्त संपर्क नव्हता, परंतु मुलीवर विश्वास ठेवून त्यांनी तिला उच्च शिक्षण दिले. भुजबळ नॉलेज सिटी मधून आयटी क्षेत्रातील पदवी प्राप्त केल्यानंतर वर्षाने संदीप फाउंडेशन येथून एमटेक पदवी मिळवली.

तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या मदतीने पुढील शिक्षण सुरू ठेवण्यासाठी लंडन येथील ग्रीनवीच युनिव्हर्सिटी येथील प्राथमिक पूर्व चाचणी परीक्षा दिली. त्यामध्ये चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाल्याने तिला तेथे प्रवेश मिळाला.

तिने नुकतीच एमएस पूर्ण केले. एका शेतकरी कुटुंबातील मुलगी लंडनमध्ये जाऊन पदवी प्राप्त करते, ही बाब ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

श्रीमंत थोरले बाजीराव पतसंस्था संस्थापक अध्यक्ष नारायण वाजे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अंबादास वाजे, माजी सरपंच कमलाकर वाजे, दिनकर वाजे, सरपंच ज्ञानेश्वर ढोली, रामनाथ पावशे, उद्योजक अण्णासाहेब वारुंगसे, अरुण वारुंगसे आदींसह ग्रामस्थांनी वर्षाचे कौतुक करत तिचे वडील लक्ष्मण वाजे यांचा सन्मान केला.

"शेतकरी परिवारातून लंडनपर्यंत वर्षांने मारलेली झेप एक शेतकरी म्हणून माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. देशातील सर्व शेतकरी बांधवांसाठी सुद्धा प्रेरणादायी आहे."

- लक्ष्मण वाजे, वर्षाचे वडील.

While honoring Varsha Waje at the University of Greenwich
Success Story: कॉलेज बाहेरील चहाचं दुकान ते कोट्यावधींची संपत्ती, अंकित राजचा प्रेरणादायी प्रवास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.