Success: E Cycle उत्‍पादनात मराठमोळ्या गोकूळची भरारी! वयाच्‍या 19व्या वर्षी यशस्‍वी साधला उद्योजकतेचा प्रवास

Brand Ambassador MP Dr. Amol Kolhe with Mukti E-Bicycle. Young entrepreneur Gokul Patil in the second photo
Brand Ambassador MP Dr. Amol Kolhe with Mukti E-Bicycle. Young entrepreneur Gokul Patil in the second photoesakal
Updated on

Success Story : सर्वसामान्‍य कुटुंबातून आलेल्या युवकाने आपल्‍या धडपड्या वृत्तीतून उद्योजकतेत गगन भरारी घेतली आहे. काळाची गरज ओळखून इ- सायकल उत्‍पादनात मराठमोळ्या गोकूळ पाटील या युवकाने वयाच्‍या ऐकविसाव्‍या वर्षी यशस्‍वी उद्योजक होण्याचा प्रवास साधला आहे.

येत्‍या काळात इ- सायकल वितरणाचे जाळे राज्‍यभर विस्‍तारण्यासाठीचे प्रयत्‍न गोकूळकडून सुरू आहेत. (Success story Gokul in E Cycle production successful entrepreneurship journey at age of 19 nashik news)

मुळचा शिरपूर (जि.धुळे) येथील गोकूळ पाटील याने लहानपणापासून खटाटोप सुरु केला होता. प्रकल्‍प, नवसंशोधनाची आवड असल्‍याने पाचवीत असताना त्याने विज्ञान प्रदर्शनात प्रकल्‍प सादर करताना बक्षीस पटकावले.

तेव्‍हापासून दहावीपर्यंत त्‍याने सातत्‍याने विज्ञान प्रदर्शनात सहभाग नोंदविला. दहावीच्‍या सुट्यांदरम्‍यान बातम्‍यांमध्ये कापर्डीतील घटनेतून त्‍याच्‍या संवेदनशील मनावर खूप प्रभाव टाकला. यानंतर त्‍याने महिलांच्‍या सुरक्षेवर काम करण्याचा ध्यास बाळगला.

अनेकांच्‍या मदतीने महिनाभर प्रकल्‍पावर काम करताना महिला सुरक्षेचे उपकरण साकारले. दहावीनंतर पदविका शिक्षणास प्रवेश घेतांना तंत्रनिकेतन सुरु होऊन अवघे अठरा दिवस झालेले असताना सोलर बाईकचा प्रकल्‍प हाती घेतला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Brand Ambassador MP Dr. Amol Kolhe with Mukti E-Bicycle. Young entrepreneur Gokul Patil in the second photo
Success Story : जिद्द, मेहनतीच्या बळावर मजुरांची मुले पोलिस खात्यात!

चौघा मित्रांनी मिळून सोलार बाईक अवघ्या आठ दिवसांत साकारली. यशस्‍वी घोडदौड सुरु ठेवताना गोकूळ आज दोन कंपन्‍यांचा मालक झालेला आहे. सध्या मित्र आनंद तावरे याच्‍या साथीने तो ई-सायकल उत्‍पादनात उतरलेला आहे.

बारामतीत निर्मिती, नाशिकला जोडणी

मुक्‍ती विंग्‍स इलेक्ट्रिक सायकलच्‍या सुट्या भागांची निर्मिती बारामती येथील कारखान्‍यात केली जाते आहे.

तर सर्व भागांची जोडणी करण्याचा प्रकल्‍प त्‍यांनी नाशिकला साकारलेला आहे. मुक्‍ती ई-बायसिकलचे ब्रँड ॲम्बेसिडर म्‍हणून खासदार डॉ.अमोल कोल्‍हे असून, छत्रपती संभाजी महाराजांवरील महानाट्यादरम्‍यान सायकलचे अनावरण करण्यात आलेले आहे.

आता विस्‍तारीकरणावर भर दिला जात असून, राज्‍यभर जाळे निर्माण करण्यावर भर असल्‍याचे गोकूळ पाटील याने आवर्जून नमूद केले.

Brand Ambassador MP Dr. Amol Kolhe with Mukti E-Bicycle. Young entrepreneur Gokul Patil in the second photo
MPSC Success Story : ‘एमपीएससी’ परीक्षेत पातोंड्याच्या तरुणांची बाजी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.