Success Story: जिद्द, चिकाटीच्या जोरावर जगदीशची यशाला गवसणी! पहिल्याच प्रयत्नात कृषी अधिकारी

MPSC
MPSC esakal
Updated on

Success Story : जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या बळावर बेंदीपाडा (ता.कळवण) येथील जगदीश बबन बागूल याने कृषी अधिकारी पदाला गवसणी घातली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या कृषिसेवा परीक्षा मधून कृषी अधिकारी (राजपत्रित वर्ग २) पदासाठी जगदीशची निवड झाली आहे. पहिल्याच प्रयत्नात जगदीशने हे यश संपादन केले. (Success Story Jagdish bagul success through determination and perseverance Agriculture Officer in first attempt nashik)

जगदीशचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अभोणा येथे झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण प्रवरा पब्लिक स्कूल प्रवरानगर (ता. राहाता) यानंतर सातारा येथील शासकीय कृषी महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले.

पदव्युत्तर पदवीचे शिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथून वनस्पती रोगशास्त्र या विषयात पूर्ण केले. पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत असताना जगदीश याचे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत पहिल्या प्रयत्नात यश संपादन केले.

पारंपारिक शेती हाच एकमेव व्यवसाय असल्याने जगदीशच्या घरची आर्थिक परिस्थिती नाजूक होती. कृषी क्षेत्रात शिक्षण घेणे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून शालेय जीवनापासून कृषी क्षेत्राशी नाळ जोडली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत मेहनत, जिद्द व अभ्यासातील सुसूत्रता राखत जगदीशने हे यश गाठले. त्याच्या या यशामध्ये आई-वडील, शिक्षक, मित्र, नातेवाईक यांचा मोठा वाटा आहे.

"परंपरागत व्यवसाय शेती आहे. देशाचा पोशिंदा प्रती काहीतरी देणे आपण लागतो. ग्रामीण व आदिवासी भागात आधुनिक शेतीतून आर्थिक सुबत्ता यावी. शेतीच्या विकासासाठी बालपणापासून ध्यास धरला. त्यादृष्टीने पदवीचे शिक्षण कृषी क्षेत्रात पूर्ण करून स्पर्धा परीक्षेत यश मिळविले. नवनवीन प्रयोग करून पारंपारिक शेतीचा कायापालट करण्याचा मानस आहे."

- जगदीश बागूल

"प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असून कुटुंबातील मुलांवर घडविलेले संस्कार, शिस्त व अभ्यासातील सातत्य याचे हे फलित आहे." - बबन बागूल, वडील

MPSC
Success Story : शेतकरी कन्येची महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! बागलाण तालुक्यातील पहिली मुलगी...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.