Success Story : आदिवासी पाड्यातील अल्पभूधारक शेतकऱ्याच्या लेकीची PSI पदाला गवसणी

Congratulations by villagers of Lata Bagul
Congratulations by villagers of Lata Bagulesakal
Updated on

वणी (जि. नाशिक) : दिंडोरी व चांदवड तालुक्याच्या सीमेवर असलेला रामायेसूपाडा ता. चांदवड या छोट्याशा आदिवासी पाडयावरील अल्पभूधारक शेतकऱ्याची लेक लता कोंडाजी बागुल हीने जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमाच्या जोरावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पोलीस उपनिरीक्षकपदाची परीक्षा उत्तीर्ण होत आपल्या आई वडीलांचे स्वप्न साकार केले आहे. (Success Story lata bagul daughter of smallholder farmer in tribal district passed MPSC PSI Exam nashik news)

अवघ्या दोनशे लाेकसंख्या असलेल्या रामायेसुपाडा (पारेगाव) येथील कोंडाजी बागुल व विमल बागूल हे अल्पभूधारक शेतकरी दांपत्य. त्यांना दोन मुलगी व १ मुलगा. त्यापैकी मुलगा धर्मराज ही सर्वात मोठा मुलगा तो शेती करतो तर लता ही दोन नंबरची मुलगी. लता ही लहान पणापासून हुशार, जिद्दी, अभ्यासू मुलगी. तिचे प्राथमिक शिक्षण गावात रामायेसूपाडा येथे, माध्यमिक शिक्षण पारेगांव येथील जनता विद्यालयात झाले.

यानंतर पुढील शिक्षणासाठी चांदवड येथील होळकर ज्यूनियर कॉलेजला ११ वी व १२ वी व बीएस्सी एस. पी. एच. जैन सायन्स कॉलेज चांदवड येथेच २०१९ ला पूर्ण केले. या प्राथमिक ते पदवी पर्यंतच्या शैक्षणिक प्रवासात प्राथमिक शिक्षक चौधरी, बच्छाव आणि सोनवणे सर यांनी माझा प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम केला. आयुष्यात यश मिळण्यासाठी पाया भक्कम असणे खूप गरजेचे असते आणि तेच काम त्यांनी खूप चांगल्या प्रकारे केल्याचे तसेच माध्यमिक शिक्षक नरेंद्र वड व एस. एस. पठाडे यांनी स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण केल्याचे लता बागूल सांगते.

प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे मराठी माध्यमातून झाले असल्यामूळे ११ वीला विज्ञान शाखेत प्रवेश घेतला, मात्र सर्व विषय इंग्रजीत असल्याने सर्व डोक्यावरून जात होते, पण माहिती होतं कष्ट अटळ आहे म्हणून मी जिथे तिथे न डगमगता अभ्यास केला व पदवी पर्यंत माझा माझा पहिला क्रमांक येत गेला असल्याचे लता बागूल ने पदवी पर्यंतच्या शिक्षण प्रवासाबद्दल सांगितले. त्यात लताला विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाली, व त्या शिष्यवृत्तीचा पुढील शिक्षणासाठी योग्य वापर करण्यास करण्याचे लताने ठरवत, युपीएससीच्या तयारीसाठी पुण्याला जायचा निश्चिय केला.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

Congratulations by villagers of Lata Bagul
Chicken shop : ‘गाव तिथे चिकन सेंटर’च्या माध्यमातून रोजगार निर्मीती; वर्षाला होतेय मोठी आर्थिक उलाढाल

पण पुण्याला शिक्षण व क्लास लावायचा तर मोठी फी, राहाण्याचा मोठा खर्च होता. मात्र आई-वडीलांनी आर्थिक तजबीज करुन खंबीरपणे माझे पाठीमागे उभे होते, त्यांनी कसल्याही गोष्टीची मला कमतरता भासू दिली नसल्याने लताने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. सुरुवातीला अभ्यास करतांना अनेक अडचणींनी सामोरे जावे लागले. दोन वेळा युपीएससीची लताने परीक्षा दिली, पण अपयश आले. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुण्यातून घरी यावे लागले.

कोविड काळात घरच्यांनी कधी काम न सांगती अभ्यासासाठी मदत केली. त्यामूळे सतत अभ्यासात सातत्य ठेवले. युपीएससीच्या परीक्षेत अपयश आल्याने एमपीएससीची परीक्षा देण्याचा निर्णय घेवून आता यश मिळाल्या शिवाय घरी न परतण्याचा निर्धार करीत लताने पुन्हा जानेवारी २०२२ ला पूणे गाठले. व तेथे सात - आठ महिन्यात अभ्यासाचे योग्य नियोजन, योग्य मार्गदर्शन मिळवत राज्य उत्पादन शुल्क पोलिस उपनिरीक्षकाची परीक्षा दिली. आणि पहिल्याच प्रयत्नात लताने यश मिळविले आहे.

ज्यावेळी तुम्हाला बघताच समोरची व्यक्ती नम्रपणे ओळख दाखवते किंवा नमस्कार करते त्यावेळी समजून घ्या की जगातील सगळ्यात मोठी श्रीमंती आपण कमावले आहे हीच गोष्ट मी पास झाल्यानंतर मला जाणवले असल्याचे लता बागूल यांनी भावना व्यक्त केली. दरम्यान कठीण परिस्थितीतून तिने मिळवलेल्या या यशाबददल गावकऱ्यांच्या वतीने तसेच शिक्षक, सामाजिक कार्यकर्त्यांनी लताचा सत्कार करण्यात आला. दिंडोरी, चांदवड तालुक्यातुनही तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Congratulations by villagers of Lata Bagul
SAKAL Exclusive : कॉम्‍प्‍युटर, IT इंजिनिअरिंग ‘लई भारी..!’; अभियांत्रिकीला वाढले प्रवेश

आई-वडिलांनी दाखविलेला विश्वास, शिक्षकांसह नातेवाईकांनी केलेले मार्गदर्शन आणि मित्र मैत्रीनींची साथ, मोबाईलचा अभ्यासाच्या संदर्भासाठी व मार्गदर्शन मिळविण्यासाठीच केलेला वापर, यामुळे मी हे यश संपादन करू शकले. यासाठी मेहनत व प्रामाणिक प्रयत्न आवश्यक आहेत. ग्रामीण भागातून असल्याचा कमीपणा किंवा भीती न बाळगता जिद्दीने प्रयत्न केल्यास यश नक्की मिळते.

लता बागूल, राज्य उत्पादन शुल्क पीएसआय

"लहानपणापासून लता हुशार होती. तिला शिक्षणाची आवड होती. ती काहीतरी करून दाखवणार हा विश्वास होता म्हणून कौटुंबीक अन्य खर्चात काटकसर करुन सर्वांतोपरी मदत केली आणि तिने तीचे चिज करून दाखविले. खूप आनंद होत आहे आणि खूप अभिमान वाटतोय." - कोंडाजी बागूल, लताचे वडील

Congratulations by villagers of Lata Bagul
Success Story : तरसाळीच्या पल्लवी जाधवची उत्तुंग भरारी; सहाय्यक विक्रीकर निरीक्षक पदाला गवसणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.