मालेगाव शहर (जि. नाशिक) : येथील दिलीप निकम व आशा निकम- पवार या शिक्षक दाम्पत्याचा मुलगा शुभमची वयाच्या २२ व्या वर्षी भारतीय सैन्य अकादमीत लेफ्टनंट पदावर निवड झाली. शुभम यास लहानपणापासून सैन्य व संरक्षण दलाबद्दल आकर्षण होते. संरक्षण प्रबोधिनीत निवड व्हावी, या दृष्टीने तो तयारी करीत होता. (Success Story Malegaon Shubham Nikam became lieutenant through tough training in IMA Nashik News)
सौंदाणे (ता. मालेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेऊन दहावीनंतर औरंगाबाद येथे एस. पी. आय. मध्ये निवड झाली होती. त्यानंतर खडकवासला (पुणे) येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत तीन वर्षांसाठी सैन्यदल पूर्व शिक्षण घेण्यासाठी निवड झाली होती. एक वर्षाचे खडतर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. नुकत्याच डेहराडून येथील इंडीयन मिल्ट्री ॲकॅडमी येथे पार पडलेल्या कमिशनिंग दीक्षांत समारंभात शुभमला इन्फन्ट्रीमध्ये ‘लेफ्टनंट’ पदवी प्रदान करण्यात आली.
‘द ग्रेनेडीयरस युनिट’मध्ये पंजाबमधील फिरोजपूर येथे पदस्थापना देण्यात आली आहे. डेहराडून येथे झालेल्या दीक्षांत समारंभात निकम परिवार उपस्थित होता. मुळ सौंदाणे येथील असलेला निकम परिवार सध्या मालेगाव येथे वास्तव्यास आहेत. या यशाबद्दल सौंदाणेकरांची मान उंचावली असून, सैन्यातील अधिकारी होण्याचा बहुमान गावाला मिळाल्याबद्दल ग्रामस्थ व तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी शुभम व निकम परिवाराचे कौतुक केले.
हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...
"भविष्यात संपूर्ण भारतात कोठेही देशसेवा व भारत मातेचे संरक्षण करण्याचा निश्चय केला आहे. देशसेवेसाठी सदैव तत्पर राहील."- शुभम निकम, लेफ्टनंट
"बालपणापासून असलेली आवड व मिळालेल्या संधीचे सोने केले. सैन्यातील अधिकारी होण्याचे स्वप्न सत्यात उतरवले. त्याचे गुरूजण व मार्गदर्शक यांचे पाठबळ प्रेरक ठरले."
- दिलीप निकम, प्राथमिक शिक्षक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.