Success Story : मीलनच्या स्वप्नांना मिळाले आकाश; सामान्य कुटुंबातील तरुण झाला डॉक्टर!

President of Arya Foundation Dr. Dharmendra Patil felicitate milan poptani
President of Arya Foundation Dr. Dharmendra Patil felicitate milan poptaniesakal
Updated on

Success Story : अंगभूत हुशारी असूनही घरची बेताच्या परिस्थितीमुळे प्रवेश शुल्कावाचून डॉक्टर होण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहणार होते. पण आर्या फाउंडेशनने या होतकरू तरुणाला मदतीचा हात देत त्यांच्या पंखात बळ भरले. पंखात मिळालेल्या बळामुळे हा तरुण आपले स्वप्न पूर्ण करत उंच भरारी घेऊ शकला.

आपला मुलगा डॉक्टर झाला हे कळताच आई-वडिलांच्या अश्रूचा बांध फुटला. म्हणतात ना, मदत करण्यासाठी दिलेला हात हा प्रार्थना करण्यासाठी जोडलेल्या हातापेक्षा अधिक उपयुक्त असतो, अगदी याचाच प्रत्यय एका तरुणाच्या स्वप्नपूर्तीने संपूर्ण जळगावकरांना आला. (Success Story Meelan poptani young man from normal family became doctor nashik news)

जळगावातील पांडे डेअरी चौकातील पोपटाणी कुटुंबाची परिस्थिती सामान्यच होती. आई शिवणकाम आणि ब्यूटिपार्लरचा छोटा व्यवसाय करते. वडील वेळेनुसार छोटी-मोठी कामे करून संसाराचा रहाटगाडा ओढतात.

कुटुंबातील विजिगिशू वृत्तीचा मुलगा मीलन हा डॉक्टर होण्याच्या जिद्दीने ‘नीट’ परीक्षेत चांगले गुण मिळवून २०१८ मध्ये उत्तीर्ण झाला. परंतु त्याच्या एमबीबीएसच्या शिक्षणचा ‘प्रवेश शुल्क’ अडथळा ठरत असल्याने शहरातील नेत्रतज्ज्ञ डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी आपल्या आर्या फाउंडेशनच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षणासाठी मिलनला दत्तक घेतले होते.

त्यासाठी प्रथम वर्षाचे शिक्षण शुल्क ७८ हजार, दुसऱ्या वर्षाचे शुल्क एक लाख ३० हजार दोनशे, तिसऱ्या वर्षीच्या पहिल्या सत्राचे शुल्क ८६ हजार ६०० रुपये, एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षीच्या दुसऱ्या सत्राचे शुल्क ८६ हजार ६०० रुपये अशी आजवर शासकीय फी आर्या फाउंडेशनद्वारा भरण्यात आली.

त्यामुळे मीलन पोपटाणी हा नायर हॉस्पिटल मुंबईमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेऊ शकला. मुलगा डॉक्टर झाल्याने मीलनच्या आई-वडिलांनी आर्या फाउंडेशनच्या मदतीमुळे मुलगा डॉक्टर झाल्याच्या भावना व्यक्त केल्या.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

President of Arya Foundation Dr. Dharmendra Patil felicitate milan poptani
Gas Price Reduction : घरगुती पाइप, गॅस व सीएनजीच्या किमतीत या जिल्ह्यांत कपात!

मदतीचे झाले चीज

डॉ. धर्मेंद्र पाटील यांच्या प्रयत्नांनी आर्या फाउंडेशनच्या माध्यमातून मिळालेल्या आर्थिक आणि मानसिक मदतीचे चीज करीत मीलन पोपटणी हा प्रथम वर्ष एमबीबीएस मध्ये ७६.३३ टक्के, तर दुसऱ्या वर्षी ८०.१८ टक्के गुण मिळवित उत्तीर्ण झाला.

पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी सर्व विषयांत मीलन हा विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाला हे विशेष. तिसऱ्या वर्षाच्या प्रथम सत्रातदेखील मीलनला ७५.२५ टक्के गुण मिळाले. तिसऱ्या वर्षाच्या दुसऱ्या सत्रात ७४.११ टक्के गुण मिळवत मीलनने एमबीबीएस उत्तीर्ण केले.

"आर्या फाउंडेशनने मला केलेली मदत मी विसरणार नाही. संस्थेचे हे कार्य वाढविण्यासाठी यापुढे मीदेखील आर्या फाऊंडेशनला मदत करीत राहील."- डॉ. मीलन पोपटाणी

"हुशार आणि होतकरू विद्यार्थी केवळ पैशाअभावी शिक्षणापासून वंचित राहू नये हा संस्थेचा उद्देश आहे. मीलन भविष्यात जळगावातील नामांकित डॉक्टर होईल, यात शंका नाही."

- डॉ. धर्मेंद्र पाटील, अध्यक्ष, आर्या फाउंडेशन

President of Arya Foundation Dr. Dharmendra Patil felicitate milan poptani
Life In Balance : रंजले, गांजल्यांच्या मुखी पडो दोन घास! दिव्यांग, वयोवृद्धांना मोफत जेवण देणारे हॉटेल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()