CA Success Story: जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर देसराणे येथील नेहा पवार झाली सीए!

Villagers congratulating Neha Pawar for passing the CA exam
Villagers congratulating Neha Pawar for passing the CA examesakal
Updated on

CA Success Story : जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर कळवण तालुक्यातील देसराणे येथील नेहा पंडितराव पवार हिने सीए अंतिम परीक्षेत उत्तीर्ण होत यश संपादन केले असून वडिलांच्या आग्रहाखातर करियरच्या पारंपरिक वाटा न निवडता आपल्या बुद्धिमत्तेने सीए होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. (Success Story Neha Pawar from Desrane became CA through determination and perseverance nashik)

आर. के. एम. महाविद्यालयातून इयत्ता दहावीमध्ये ९२ टक्के गुण मिळवून कळवण तालुक्यांमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या नेहाने नाशिक येथील केटीएचएम महाविद्यालयातून एम.कॉम चे आणि सीएचे शिक्षण पूर्ण करत नेहाने आपले ध्येय पूर्ण केले.

द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया यां संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या मे २०२३ मध्ये झालेल्या सीए फायनल परीक्षेत उत्तीर्ण होऊन तीने यशाला गवसणी घालत आपले ध्येय पूर्ण केले.

नेहाचे वडील पंडितराव शंकर पवार हे सार्वजनिक बांधकाम, इमारत व दळणवळण जिल्हा परिषद येथे कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होते. मुलीने अभ्यासात सातत्य ठेवून यशाचे शिखर गाठावे हे त्यांचे स्वप्न मुलीने सार्थकी ठरवल्याने वडिलांचे कष्टाचे चीज झाल्याचे नेहा च्या यशाने सिद्ध झाले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Villagers congratulating Neha Pawar for passing the CA exam
IAS Officer Success Story : विना कोचिंग रॉकेलच्या दिव्यात केला अभ्यास; आधी झाले IRS अन् आता IAS

देसराणे येथील नेहा पवार हिच्या म्हणण्यानुसार आमच्या पुर्ण परिवारात व नातलगामंध्ये सीए क्षेत्रात कोणीही नसताना माहेरची आणि सासरची मिळालेली भक्कम साथ, जिद्द, आत्मविश्‍वास आणि अभ्यासाच्या बळावर नेहाने हे यश संपादित केले आहे. नेहा हिचे पती ऋषीकेश पाटील देखील याच क्षेत्रात असल्याने नेहा हिस योग्य मार्गदर्शनही मिळाले.

"कोणतेही उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रयत्नांमध्ये सातत्य असणे गरजेचे आहे. उच्च शिक्षण विभागाची निवड करताना विचारपूर्वक निवड करावी, व त्यामध्ये परिश्रम करणे आवश्यक आहे. उच्च शिक्षणसाठी पाया देखील महत्त्वाचा आहे. सीए परीक्षेत या शिक्षणाचे ही योगदान आहे. आई , वडील, पती, सासू, सासरे, आणि कुटुंबातील सर्वांनीच पाठिंबा दिल्याने मी हे यश संपादन करू शकली." - नेहा पवार , सीए

Villagers congratulating Neha Pawar for passing the CA exam
PSI Success Story: ‘गरुडझेप’ची प्रतीक्षा पीएसआय होताच बापाने वाटले गावभर पेढे!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.