Success Story : बागलाणच्या दोन लेकींची गगनभरारी! कौतुकाचा वर्षाव

poonam bhamare and maya pawar
poonam bhamare and maya pawaresakal
Updated on

Success Story : बागलाण तालुक्यातील पिंगळवाडे व नांदीन येथील लेकी पोलिस भरतीचे सर्व निकष पूर्ण करत विविध अडथळ्यांच्या शर्यतीतून पोलिस दलात दाखल झाल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पिंगळवाडची पूनम भामरे, नांदीनची माया पवार यांचा यात समावेश आहे. (success story poonam bhamare and maya pawar from baglan joined police force nashik news)

पूनमने याआधी राज्यस्तरीय महिला हॉकी स्पर्धेत घवघवीत यश मिळविले होते. पोलिस दलात जानेवारी महिन्यात भरती झाली होती. त्या पोलिस भरतीचा निकाल ११ एप्रिलला लागला. त्यात पुनम भामरे हिने क्रीडा क्षेत्रातून पोलिस भरतीत यश संपादन केले. पूनम ही सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे.

तिचे आई-वडील शेतकरी आहेत त्यामुळे पूनमला मिळालेला या यशामुळे पूनमच्या घरी आनंदाचे वातावरण आहे. पूनमची जिद्द व चिकाटी यांचा पूनमला नक्कीच फायदा झाला. आर्य ॲकॅडमीचे संचालक यांनी पूनमचे कौतुक केले. नांदीन (ता. बागलाण) येथील विद्यार्थिनी माया पवार यांची अनुसूचित जमाती प्रवर्गातून पोलिस दलात नियुक्ती झाली आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

poonam bhamare and maya pawar
Unseasonal Rain Damage : कांद्यापाठोपाठ आता द्राक्ष उत्पादकही हतबल! उत्पादन खर्चही फिटेना

माया पवार यांची घरची परिस्थिती सुद्धा सर्वसामान्य कुटुंबातील आहे. वडिलांचे छत्र हरपल्याने खचून न जाता आईच्या प्रोत्साहनाने ती हे यश मिळवू शकली. बागलाच्या या दोन्ही मुलींनी मिळवलेल्या यशाबद्दल पिंगळवाडे व नांदिन गावातील नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

"माझी पोलिस होण्याची इच्छा पूर्ण झाली आहे. क्रीडा क्षेत्राबाबत आयुष्यात मी नक्कीच इतर मुलींना पोलिस दलात येण्यासाठी प्रोत्साहन, मार्गदर्शन करेल. मुलींनी जिद्द आणि आत्मविश्वास ठेवल्यास यश हमखास मिळते." - पूनम भामरे, पिंगळवाडे

poonam bhamare and maya pawar
Dada Bhuse Viral Video: मंत्री दादा भुसेंनी सिनेस्टाईल पकडला पिकअप, समोर आला धक्कादायक प्रकार; व्हिडिओ व्हायरल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.