PSI Success Story: ‘गरुडझेप’ची प्रतीक्षा पीएसआय होताच बापाने वाटले गावभर पेढे!

बुलढाणा जिल्ह्यातील तरूणीच्या यशाची थक्क करणारी कहाणी
pratiksha rathod
pratiksha rathod esakal
Updated on

PSI Success Story : जिद्द आणि चिकाटी, तेही इप्सित साध्य करण्याची तयारी असेल, तर कितीही संकटे येऊ द्या, तुम्ही त्याला हिमतीने सामोरे जाता आणि यश संपादन करता.

याचाच प्रत्यय देणारी बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी आणि गरूडझेप अकॅडमीची विद्यार्थिनी प्रतीक्षा हिम्मत राठोड हिच्या यशाची कहाणी थक्क करणारीच आहे. (Success Story pratiksha rathod from buldhana become mpsc psi nashik)

अगदी कमी वयात आणि पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रतिक्षाने पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. निकाल जाहीर होताच तिच्या अपंग असलेल्या ट्रकचालक वडिलांनी गावभर पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

वडील हिम्मत वाच्छू राठोड यांना ऐन मेन परीक्षेच्यावेळी अपघात झाला. पायाला गंभीर दुखापत होऊन ते अंथरूणाला खिळल्याने प्रतीक्षाचे अवसानच गळाले होते. घरची परिस्थिती जेमतेम. तिला तीन बहिणी आणि एक भाऊ.

या सर्वांचे पालन पोषण करताना, संसाराचा गाडा हाकताना राठोड यांना अक्षरशः कसरत करावी लागायची. प्रतीक्षा व तिच्या तिन्ही बहिणी सुरवातीपासून हुशार. त्यामुळे राठोड यांनी त्यांच्या शिक्षणासाठी काही कमी पडू दिले नाही.

स्वतः अशिक्षित असतानाही त्यांनी सर्व मुलींना उच्चशिक्षित केले. प्रतिक्षाचे बारावीपर्यंतचे शिक्षण वीर पांगरा (जि. बुलढाणा) येथे झाले. दहावी आणि बारावीलाही ती टॉपर राहिली. पुढे गरुडझेप अकॅडमीत दाखल झाल्यानंतरही ती मुक्त विद्यापीठातून बी. ए. परीक्षा उत्तीर्ण झाली.

खरंतर तिचा ओढा परिचारिका होण्याकडे होता; परंतु प्राचार्य विनायक भानोसे यांनी तिची हुशारी, आयक्यू लेव्हल व मानसिक स्वास्थ्य बघून तिला स्पर्धा परीक्षेकडे आणि विशेषतः लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करण्याचा सल्ला दिला.

गरुडझेप अकॅडमीतच तिने फिजिकल ट्रेनिंग घेतले. त्यासाठी तिने काही काळ श्री. रेड्डी यांच्याकडूनही मार्गदर्शन घेतले. माझ्या या यशात गरुडझेप अकॅडमीचे संचालक प्रा. सुरेश सोनवणे यांचे महत्वपूर्ण योगदान असल्याचे तीने आवर्जून सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

pratiksha rathod
PSI Success Story: पोलिस भरतीचा नाद सोडून थेट स्पर्धा परीक्षा दिली अन् पठ्ठ्या पहिल्याच प्रयत्नात यशस्वी

आई-वडिलांनीही माझ्यासह तिघी बहिणींनी शिकून मोठे व्हावे यासाठी सातत्याने प्रोत्साहन दिले. तिन्ही बहिणी विवाहित असून, दोघी इंजिनीयर, तर एक ब्युटीशियन आहे. आई-वडिलांनी मुलगा-मुलगी असा भेदभाव कधीच केला नाही.

आमच्या शिक्षणासाठी त्यांनी किती कष्ट उपसले याची आम्हाला जाणीव आहे. माझ्या यशात बहिणी आणि सर्व मेहुण्यांचेही मोलाचे योगदान आहे. त्यांनी वेळोवेळी केलेली मदत मी कदापि विसरणार नाही, असेही प्रतीक्षा नमूद करते.

...तर यश तुमचेच

मुलींच्या आशा-आकांक्षा हेरून त्यांना त्यांचे भवितव्य घडविण्याचे स्वातंत्र्य द्या. त्यांच्या स्वप्नांना साद द्या. मुलगा-मुलगी असा भेदभाव न करता सर्वांनाच सामान्य वागणूक द्या. असा सल्ला प्रतीक्षाने पालकांना दिला आहे.

तसेच, मुलींनी मेहनत केली, तर कोणतेही लक्ष्य ती साध्य करू शकते. तुमचे उद्दिष्ट ठरवा आणि त्यादृष्टीने प्रयत्न करा. यशाचे शिखर तुम्ही निश्‍चितच गाठाल. असा सल्लाही प्रतीक्षाने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलींना दिला आहे.

"मी येथेच थांबणार नाही. उच्च अधिकारी व्हायचे माझे स्वप्न आहे. यामुळे यापुढेही यूपीएससी, तसेच उच्चपदाच्या अन्य परीक्षा मी देतच राहणार."-प्रतिक्षा राठोड

pratiksha rathod
PSI Success Story : अभ्यासातील सातत्याने गाठले यशाचे शिखर! अथक परिश्रमाने रविकांतची पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.