Nashik Success Story : मेंढपाळाचं पोरगं झालं फौजदार! मेंढ्या वळून केला अभ्यास...

success story Rajendra Kolekar become police in first exam nashik news
success story Rajendra Kolekar become police in first exam nashik news esakal
Updated on

Nashik Success Story : डोक्याला पागोटं, अंगात सदरा अन्‌ धोतर घातलेला बाप अन्‌ शहरातल्या लवाजम्यात हरखून केलेली कपाळावर आडवा कुंकू लावलेली नववार लुगड्यातली माय... धाकटी बहीण अन्‌ काका आपल्या खाकी वर्दीतल्या फौजदार झालेल्या जवान पोराला निरखून पाहत भंडारा उधळून त्यांनी एकच जल्लोष केला. (success story Rajendra Bhikaji Kolekar become police in first exam nashik news)

‘मेंढपाळाचं पोरगं आज फौजदार झालं या... लय भारी वाटतंय... घरात पहिलाच जवान शाळा शिकला अन्‌ मेंढ्या वळूनसन फौजदार झाला...’, असे बापाला बोलताना पाहून फौजदार पोराचे डोळेही पाणावले.

राजेंद्र भीमाजी कोळेकर हा ढवळपुरीचा. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातलं हे एक छोटसं गाव. धनगर समाजातील मेंढपाळ कुटुंबातील राजेंद्रने कला शाखेतून राज्यशास्त्राचे पदवीपर्यंतच शिक्षण घेतलेले. मुळात घरातून शाळेत जाणारा, पदवीपर्यंत शिक्षण घेणारा राजेंद्र हा पहिलाच मुलगा. त्यातही मेंढ्या वळणं सुटलेले नाही. अगदी आत्तापर्यंत.

राजेंद्र याने ढवळपुरीत महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली होती. दिवसभर कष्टाचेच काम असल्याने शरीर काटक होतेच.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

success story Rajendra Kolekar become police in first exam nashik news
Success Story: एकेकाळी झोपडपट्टी असलेल्या सिंगापूरचा आजचा विकास AC मुळे झाला

पण अभ्यासाची तयारी करण्यासाठी तो आधी-मधी अहमदनगरला जायचा. शेती नाही. त्यामुळे मेंढ्यांच्या पालनपोषणावरच कोळेकर कुटुंबीयांचा उदरनिर्वाह होता.

त्यामुळे नाशिकला अकादमीमध्ये प्रशिक्षणाला येईपर्यंत राजेंद्र ढवळपुरीत मेंढ्या वळत होता. २०१९ मध्ये पहिल्याच परीक्षेमध्ये राजेंद्र याने यशाला गवसणी घातली आणि फौजदार झाला. त्याच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्रचा चुलत भाऊ गोविंद नाथा कोळेकर हा देखील सध्या महाराष्ट्र पोलिस अकादमीमध्ये १२३ व्या तुकडीमध्ये प्रशिक्षण घेत आहे.

समाजात अजूनही शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांसाठी भविष्यात नियमित मार्गदर्शन करणार असल्याचा संकल्प राजेंद्र कोळेकर याने मनाशी केला आहे.

success story Rajendra Kolekar become police in first exam nashik news
Success Story: जिद्द अन्‌ चिकाटीने यशाला गवसणी; तीन सख्ख्या बहिणी झाल्या डॉक्टर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.