Success Story : व्हायचे होते शिक्षक, झाली फौजदार! रुबियाच्या नेमप्लेटवर आईचेही नाव

success story Rubia Zaheera Tajuddin Mulani become Police Officer nashik news
success story Rubia Zaheera Tajuddin Mulani become Police Officer nashik newsesakal
Updated on

Success Story : वडील शिक्षक, त्यामुळे लहानपणापासूनच शिक्षिकाच व्हायचे, असेच स्वप्न रुबियाने रंगविले होते. पदवी घेतल्यावर डी.एड. केले. त्यानंतर पदव्युत्तर पदवीही घेतली.

परंतु, शिक्षक भरतीच्या परीक्षा होत नसल्याने निराश झालेल्यान रुबियाने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. दुसऱ्या प्रयत्नात उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. एवढेच नव्हे, तर तिने प्रशिक्षणात बेस्ट कॅडेट इन ड्रीलचा किताबही पटकावला आहे. (success story Rubia Zaheera Tajuddin Mulani become Police Officer nashik news)

रुबिया जहीरा ताजुद्दीन मुलाणी ही मूळची सुभाषनगरची (ता. मिरज, जि. सांगली). रुबियाचे वडील ताजुद्दीन मुलाणी हे शिक्षक, तर आई गृहिणी. सुशिक्षित घरात असल्याने सर्वांमध्ये शिक्षणाची गोडी. रुबियाचे एक चुलते आर्मीत सैनिक आहेत. तेवढाच काय तो खाकीशी संबंध. मोठा भाऊ बँकेत नोकरीला.

रुबियानेही शिक्षिका होण्यासाठी ‘टीईटी’ची स्पर्धा परीक्षेची तयारी केली. परंतु, मधल्या काळात परीक्षात होत नव्हत्या. त्यामुळे शिक्षक भरतीही रखडली. परिणामी, तिने पुणे गाठले आणि २०१७ पासून स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

success story Rubia Zaheera Tajuddin Mulani become Police Officer nashik news
Success Story : पठ्ठ्यानं करुन दाखवलं! चार वेळच्या अपयशानंतर शेतकरीपुत्र झाला एसआरपीएफमध्ये पोलिस

पहिल्या परीक्षेत अपयश पदरी आले. परंतु, त्याने खचून न जाता पुन्हा तयारी केली आणि २०१९ मध्ये झालेल्या उपनिरीक्षकांच्या परीक्षेत यश नोंदविले. घरातीलच नव्हे, तर त्यांच्या मुलाणी परिवारातील (खानदान) ती पहिलीच पोलिस अधिकारी झालेली महिला आहे. त्याचा सार्थ अभिमान तिच्या आई-वडीलांना आहे.

नेमप्लेटवर आईचे नाव

अलीकडे मुले-मुली आपल्या नावापुढे वडिलांच्या नावाबरोबरच आईचेही नाव लावतात. परंतु, ते कागदोपत्री असतेच, असे नाही. रुबिया हिने मात्र आपल्या वडिलांसह आईचेही नाव असलेली नेमप्लेट खाकी वर्दीवर लावलेली आहे, हे तिचे वेगळेपण बरेच काही सांगून जाते. रुबिया जहिरा ताजुद्दीन मुलाणी अशी नेमप्लेट लावलेली बहुधा ती आज प्रशिक्षण पूर्ण केलेली पहिली पोलिस महिला उपनिरीक्षक असावी.

success story Rubia Zaheera Tajuddin Mulani become Police Officer nashik news
Nashik Success Story : मेंढपाळाचं पोरगं झालं फौजदार! मेंढ्या वळून केला अभ्यास...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()