नाशिक : शेतीला जोडधंदा म्हणून ग्रामीण भागात शेतकऱ्यांकडून दुग्धव्यवसायाला प्राधान्य देण्यात आले. यात अनेक शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारली. परंतु कालांतराने हा एक स्वतंत्र व्यवसाय बनला आणि नफ्याच्या दृष्टीने अनेक नवनवीन प्रयोग होऊ लागले. याचा दुष्परिणाम मानवाच्या आरोग्यावर झाला. आरोग्याच्या समस्यांची जाण कळताच पारंपरिक व्यवसायाची नाळ तुटू न देता बांधकाम व्यावसायिक नीलेश कोतकर यांनी देशी गायींचे संवर्धन व पालन करण्यात सुरवात केली. चार वर्षांच्या कालखंडात विश्वास अन् व्यावसायिक हेतू न ठेवता गोपालन व्यवसायात यशस्वी घौडदौड केली आहे. (Successful-builder-with-Ideal-cow-rearer-nashik-marathi-news)
जनजागृती करण्याबरोबरच स्वत:पासून केली बदलांना सुरवात
चाळीसगाव (जि. जळगाव) येथील रहिवासी असलेले नीलेश कोतकर. वडील माधव रामभाऊ कोतकर यांची शहरात नम्रता डेअरी. लहानपणापासून दुग्धव्यवसायाशी नाळ जुळलेली. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर २००७ मध्ये बांधकाम क्षेत्रात ‘राजश्री डेव्हलपर्स’ या व्यवसायाची नाशिक शहरात मुहूर्तमेढ केली. बांधकाम व्यवसायात प्रगती करीत असतना कर्करोगाची वाढती संख्या व त्याचे कुटुंबीयावर होणारे परिणाम अस्वस्थ करू लागले. या परिणामात दूध हाही घटक असल्याचे लक्षात आल्याने त्या दृष्टीने अभ्यास करण्यास प्रारंभ केला. अतिरिक्त दुधासाठी केली जाणारी प्रक्रिया, रासायनिक खतांचा वापर, यासारख्या अनेकांमधून कर्करोगाला आमंत्रण मिळत असल्याचे समजले. यावर आळा बसला, नियंत्रण आणता यावे, यासाठी त्यांनी जनजागृती करण्याबरोबरच स्वत:पासून यांची सुरवात व्हावी, या उद्देशाने देशी गायींचे पालन व संवर्धन करण्याचा निर्णय घेतला. सुरवातीला महाराष्ट्रात अशा प्रकारचे व्यवसाय करणाऱ्या सर्व गोपालकांची प्रत्यक्ष भेट घेत संपूर्ण माहिती जाणून घेतली. व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांना मित्र संतोष जाधव व त्यांच्या माध्यामातून उफाडे कुटुंबीयाची साथ मिळाली.
२०१७ मध्ये व्यवसायाची मूहर्तमेढ
देशी गायींचे पालन करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर नीलेश कोतकर यांनी ४ एप्रिल २०१७ मध्ये लखमापूर फाटा येथील चेतन उफाडे, जालिंदर उफाडे यांच्या मदतीसह व्यावसायिक हेतू न ठेवता समाजसेवा म्हणून गोपालन व्यवसायास सुरवात केली. यासाठी त्यांनी सर्वप्रथम ‘थारपारकर’ या देशी प्रजातीच्या १६ गायी राजस्थान व गीर प्रजातीच्या सहा गायी भावनगर (गुजरात) येथून आणल्या. श्री. कोतकर चार वर्षांपासून महेश पितृभक्त, उफाडे कुटुंबीय यांच्या मदतीने ‘ना नफा- ना तोटा’ पद्धतीने सेंद्रिय दूधाचा व्यवसाय करीत आहेत. या कार्याची दखल २०१९ मध्ये ‘कृषिथॉन’मध्ये घेण्यात येऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. आज सद्यःस्थितीत त्यांच्याकडे २७ देशी गायी, १५ वासरे (एक नंदी) अशी ४२ गायी पशुधन आहेत.
''आजारांपासून दूर राहण्यासाठी देशी गायींचे दूध खूप फायदेशीर असल्याने मी केवळ सामाजिक हेतू ठेवत या व्यवसायात आलो. गोपालनांमध्ये मी कुठलीच तडजोड करत नाही किंवा करणार नाही. कुटुंबाचा पाठिंबा, व्यवसायात साथ देत असलेल्यांवर ठेवलेला विश्वास व योग्य व्यवस्थापनामुळे मी आज हे सर्व यशस्वीरीत्या करीत आहे.'' - नीलेश कोतकर, गोपालक तथा बांधकाम व्यावसायिक
(Successful-builder-with-Ideal-cow-rearer-nashik-marathi-news)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.