Success Story : ऊसतोडणी करणाऱ्या मजुराच्या मुलाचा PSI पदाचा यशस्वी प्रवास

Success Story
Success Story esakal
Updated on

झोडगे : आई वडील ऊसतोडीवर असताना उसाच्या फडात जन्मलेला नामदेव जेव्हा पोलिस खात्यात पीएसआय पदावर नियुक्त होतो, यासारखा भाग्याचा क्षण कोणताही नसेल, अशी भावना ‌राज्य सेवा आयोगाच्या माध्यमातून पीएसआय पदासाठी निवड झालेल्या नामदेव बोरकर यांनी व्यक्त केली.

Success Story
Succes Story : अन्न नव्हते, छत नव्हते, पण आत्मविश्वास होता म्हणून झाले पोलिस

कंधाणे (ता. मालेगाव) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमधून शिक्षण घेतलेल्या नामदेव बोरकर यांनी पुढील माध्यमिक शिक्षण शेजारच्या बेंद्रेपाडा गावात घेतले. खरं तर घरात कोणीही चौथीपेक्षा जास्त शिकलेली व्यक्ती नव्हती. नामदेव यांच्या घरात वडील चौथी नापास तर आईने कधीही शाळेची पायरीही चढली नाही, अशा घरातला मुलगा दहावी पर्यंत शिकून पास झाला. हीच कुटुंबासाठी मोठी गोष्ट होती. नामदेव शिकत असतानाच मिळेल ते काम करत होते.

झोडगे येथे वीटभट्टीवर विटा वाहण्याचे काम असेल, शेतात छोट्या हातांना मिळेल ते काम असेल, हॉटेलमध्ये भांडी धुण्याचे कामं असेल मिळेल ते काम आनंदाने करत. झोडगे येथील जनता कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेऊन उच्च शिक्षण घेऊन नोकरी करण्याच्या जिद्दीने शिक्षण सुरू ठेवले.

Success Story
Stress Free Life : आयुष्यभर राहायचे असेल आनंदी तर ही कामे करा

दिव्याखाली अभ्यास

लहानपणापासून ठरवलं होत. की आपला बाप जे काबाडकष्ट करतोय, ट्रॅक्टरवर चालक म्हणून मजुरी करतोय व स्वतःला खपवतोय, यातून आपल्या वाट्याला असे कष्ट येऊ नये या भावनेतून तसेच, कुटुंबाला वर आणायचे तर शिकलं पाहिजे, शिक्षण घेऊन नोकरी केली पाहिजे असा निश्चय केला. पण, नेमकं करायचं काय हे माहीत नव्हतं, तर लवकर नोकरी मिळावी यासाठी मनात शिक्षक व्हायचयं, असे ठरवले. त्यासाठी बारावीमध्ये अभ्यास सुरू केला, त्यावेळी घरात वीज नसायची, दिव्याखाली अभ्यास करून बारावीची परीक्षा गुणवत्ता घेऊन नामदेव उत्तीर्ण झाले.

हेही वाचा: शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

२०१४ मध्ये पोलिस शिपाई

नामदेव बोरकर यांना डी. एड प्रवेश मिळाले मात्र, कॉलेजची फी व इतर खर्च भागावा यासाठी पुन्हा कष्टमय संघर्षाची सुरवात झाली. नामदेव मालेगाव येथे शनिवारी व रविवारी सेंट्रींग कामं करणे, स्लॅब भरणे, डांबरीकरणाचे काम असे मिळेल ते काम करून डी.एडचे शिक्षण पूर्ण केले. मात्र शिक्षण घेऊन ही नोकरी मिळत नव्हती. म्हणून नाशिक येथे खासगी शिकवणी सुरु केली. २०१४ च्या पोलिस भरतीमध्ये पोलिस शिपाई पदावर रुजू झाले.

Success Story
Astro Tips for Students : परीक्षा तोंडावर आल्यात अन् अभ्यास होईना? मग 'हे' उपाय करा

नोकरी सांभाळून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू ठेवला. पोलिस खात्यात सात वर्षे लोटल्यांनतर विभागीय फौजदारसाठी झोकून अभ्यास केला. शारीरिक चाचणीची देखील तयारी केली. सर्व उत्तीर्ण होत नामदेवांची मेहनत फळास आली. दरम्यानच्या काळात आई-वडील भाऊ ज्ञानेश्वर, निवृत्ती यांनी मोलमजुरी करून घराला हातभार लावत राहिले, तसेच, मित्र पंजाब साळुंखे, राजेश टकले, विठ्ठलराव देशमुख, समाधान देवरे, धनराज देवरे पत्नी रिना यांनी प्रोत्साहन दिल्याचे श्री. बोरकर सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.