नाशिक : ‘मॅग्‍नम’ मध्ये थ्रोम्बोसाइटोपेनियाद्वारे यशस्‍वी उपचार

A team of hospital doctors and staff successfully treated a young patient at Magnum Multi Specialty Hospital
A team of hospital doctors and staff successfully treated a young patient at Magnum Multi Specialty Hospitalesakal
Updated on

नाशिक : नाशिक रोडच्या मॅग्नम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल (Magnum Multi Specialty Hospital) येथे थ्रोम्बोसाइटोपेनिया (Thrombocytopenia) उपचार पध्दतीचा वापर करत युवकावर यशस्‍वी उपचार केले आहेत. जव्हार येथील तरुण ३७ वर्षीय भानुदास बोंडे यांच्‍यावर रुग्‍णालयातील टीमने उपचार केले, अशी माहिती हृदयरोग तज्‍ज्ञ डॉ. मनोज चोपडा यांनी दिली. (Successful treatment of thrombocytopenia in Magnum hospital Nashik News)

बोंडे यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना नाशिक रोडच्या मॅग्नम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. रुग्णाचे वय लक्षात घेऊन थ्रोम्बोसाइटोपेनिया उपचार पध्दतीचा अवलंब करण्यात आला. यानंतर ऍन्जिओग्राफी केल्यानंतर निदर्शनात आले, की हृदयातील थ्रोम्बोसाईटोपेनियामुळे ब्लॉकेज पूर्णपणे नष्ट झाले. पहिल्या तीन तासात रुग्णावर योग्य उपचार झाल्यास, तसेच थ्रोम्बोसाईटोपेनियासारख्या उपचार पद्धतीमुळे व निष्णात डॉक्टरांच्या टीममुळे रुग्णाचा धोका टळला.

A team of hospital doctors and staff successfully treated a young patient at Magnum Multi Specialty Hospital
शैक्षणिक संस्थांच्या आवारात तंबाखूजन्य पदार्थ आढळल्यास कारवाई

तरुण रुग्णांमध्ये हृदयविकाराचा झटका तीव्र थ्रोम्बस निर्मितीमुळे होतो. म्हणूनच चाळीस वर्षांपेक्षा कमी वयाच्या रुग्णांना थ्रॉम्बोसाइटोपेनिया औषधाने ते विरघळते असेही डॉ. चोपडा यांनी सांगितले. ऍन्जिओग्राफीसाठी हृदयविकार तज्ञ डॉ. राहुल शेवाळे, फिजिशियन डॉ. जयदीप भंबारे, डॉ. विनीत वानखेडे यांचे विशेष सहकार्य लाभले. डॉ. चोपडा म्हणाले की, नाशिकरोड परीसरातील रुग्‍णांच्‍या सेवेसाठी मॅग्नम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल २४ तास खुले राहील. रुग्‍णालयात अद्ययावत कॅथलॅबसह इतर सर्वच मल्टी स्पेशालिटी सुविधा उपलब्‍ध असतील.

A team of hospital doctors and staff successfully treated a young patient at Magnum Multi Specialty Hospital
Nashik : निवडणुकीसाठी प्रभाग 4 नव्हे 3 सदस्यांचाच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.