Nashik Winter Update : मालेगावसह परिसरामध्ये थंडीमध्ये अचानक वाढ

शहर व परिसरातील तापमानात कधी घट तर कधी वाढ होत आहे. या बदलत्या तापमानाचा फटका कांद्यासह फळपिकांना बसत आहे.
Residents of the area warming themselves by fire here
Residents of the area warming themselves by fire hereesakal
Updated on

Nashik Winter Update : शहर व परिसरातील तापमानात कधी घट तर कधी वाढ होत आहे. या बदलत्या तापमानाचा फटका कांद्यासह फळपिकांना बसत आहे.

फळ पिकाबरोबरच अनेक नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. शहरात सर्दी, ताप, खोकला यासह साथ आजारांची रूग्णसंख्या वाढली आहे. (Sudden increase in cold in areas including Malegaon nashik news)

येथील जनरल प्रॅक्टीशनर व तज्ज्ञ डॉक्टरांची रुग्णालये हाऊसफुल आहेत. बालरूग्णालयांमध्ये तर मोठी गर्दी आहे. गेल्या दोन दिवसापासून तापमापात घट झाली असून प्रथमच थंडी जाणवू लागली आहे. गारठ्यामुळे नागरिक स्वेटर, मफलर, कान टोपी वापरातांना दिसत आहे.

Residents of the area warming themselves by fire here
Nashik Winter Update: द्राक्षनगरीला भरली हुडहुडी; तापमान 15 अंश सेल्सिअस

गेल्या दोन दिवसापासून शहरात गारठा वाढला आहे. सकाळी मोठ्या प्रमाणात सर्वत्र धुके असते. रात्री व पहाटे शहरासंह ग्रामीण भागातही शेकोट्या पेटताना दिसत आहेत. बहुसंख्य कुटूबीयांकडून ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांची विषेश काळजी घेतले जात आहे. जागोजागी शेकोटीभोवती गप्पांचे फड रंगू लागले आहेत.

Residents of the area warming themselves by fire here
Nashik Winter Update: किमान तापमानात 3 अंशांनी घट; कमाल तापमानात साडेतीन अंशांची वाढ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.