Uddhav Thackeray Birthday : 11000 प्रतिज्ञापत्र देण्याचे ठाकरेंना आश्वासन

Sudhakar Badgujar and Ajay Boraste met Shiv Sena chief Uddhav Thackeray at mumbai
Sudhakar Badgujar and Ajay Boraste met Shiv Sena chief Uddhav Thackeray at mumbaiesakal
Updated on

नाशिक : शिवसेनेचे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिकमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेना भवनमध्ये (Shiv Sena) यांना शुभेच्छा देताना अकरा हजार प्रतिज्ञापत्र देण्याचे आश्वासन दिले.

त्याचबरोबर बुधवारी (ता. २७) चारशे पदाधिकाऱ्यांनी वाढदिवसानिमित्त प्रतिज्ञापत्र भरून देताना ठाकरे यांना भेट दिली. (sudhakar badgujar ajay boraste promised to give 11000 affidavit to uddhav thackeray on birthday nashik latest Marathi political news)

Sudhakar Badgujar and Ajay Boraste met Shiv Sena chief Uddhav Thackeray at mumbai
Nashik : आठवडे बाजारात महिलांचे बजेट कोलमडले; जाणुन घ्या कसे?

शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर व माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी वाढदिवसानिमित्त माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बुधवारी मुंबईत भेट घेतली. उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देताना ४०० प्रतिज्ञापत्रांची भेट दिली.

मागील आठवड्यात साडेतीनशे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिज्ञापत्र लिहून दिले. चाळीस आमदारांसह एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर कट्टर शिवसैनिकांकडून प्रतिज्ञापत्र भरून दिले जात आहे.

नाशिक शहरातून अकरा हजार प्रतिज्ञापत्र उद्धव ठाकरे यांच्याकडे दिली जाणार असल्याचे महानगरप्रमुख बडगुजर यांनी सांगितले. मागील आठवड्यात साडेतीनशे, तर वाढदिवसानिमित्त चारशे पदाधिकाऱ्यांनी प्रतिज्ञापत्र दिले. दरम्यान, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहराचा विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Sudhakar Badgujar and Ajay Boraste met Shiv Sena chief Uddhav Thackeray at mumbai
Gatari Amavasya : ‘गटारी’च्या पार्श्‍वभूमीवर शहरभर पोलिसांची नाकाबंदी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.