Sudhakar Badgujar: सुधाकर बडगुजरांची ‘वाट बिकट’; लाचलुचपत’कडून गुन्हा दाखल

Sudhakar Badgujar
Sudhakar Badgujaresakal
Updated on

Sudhakar Badgujar : मुंबई बॉम्बस्फोटातील शिक्षा भोगत असलेला आरोपी सलिम कुत्ता याच्यासमवेत ‘डान्स’ करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने नाशिक पोलिसांच्या चौकशीच्या फेऱ्यात सापडलेले शिवसेनेच्या उबाठा गटाचे सुधाकर बडगुजर यांची वाट आणखीच बिकट झाली आहे.

महापालिकेत नगरसेवक असताना बडगुजर यांनी पदाचा दुरुपयोग करीत कामांची ठेके स्वत:च्या कंपनीला दिल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशीअंती रविवारी (ता.१७) गुन्हा दाखल केला.

तर, रविवारी सलग तिसऱ्या दिवशी बडगुजर यांची गुन्हेशाखेच्या युनिट एकमध्ये दोन ते अडीच तास चौकशी करण्यात आली. (sudhakar badgujar Contracts to own company by abusing position nashik crime news)

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २०१५-१६ मध्ये महापालिकेचे तत्कालिन आयुक्त प्रविण गेडाम यांनी तत्कालिन नगरसेवकपदी असलेले सुधाकर बडगुजर यांच्यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधकच्या नाशिक विभागाकडे बडगुजर यांनी पदाचा दुरुपयोग करीत स्वत:च्या कंपनीला कामांचे ठेके घेतल्याची तक्रारी केली होती.

बडगुजर यांनी मे. बडगुजर ॲण्ड कंपनी असून, त्यांनी २००६ मध्ये निवृत्ती घेतल्याची खोटी व बनावट कागदपत्रे बनविली. त्यानंतर ते २००७ पासून महापालिकेचे नगरसेवक म्हणून प्रतिनिधीत्व करीत आहेत. मात्र, त्यांनी ‘बडगुजर ॲण्ड कंपनी’ला त्यांनी नगरसेवक पदाचा दुरुपयोग करीत स्वत:च्या कंपनीला महापालिकेतील विविध कामांचे ठेके मिळवून दिली.

या कंपनीच्या माध्यमातून २००६ ते २००९ या कालावधीमध्ये बडगुजर यांनी ३३ लाख ६९ हजार ४३९ रुपये स्वत:च्या फायद्यासाठी स्वीकारत आर्थिक फायदा करून घेतला. सदरचा प्रकार त्यांनी संगतमताने करीत महापालिकेची फसवणूक केल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीतून निष्पन्न झाले आहे.

Sudhakar Badgujar
Sudhakar Badgujar: सलीम कुत्ता प्रकरणावर सुधाकर बडगुजरांच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, तो व्हिडिओ...

त्यामुळे याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात सुधाकर भिका बडगुजर, साहेबराव रामदास शिंदे, व सुरेश भिका चव्हाण यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे बडगुजर यांची वाट आणखीच बिकट होण्याची शक्यता आहे.

आज होणार चौकशी

बडगुजर यांच्याविरोधात रविवारी (ता.१७) सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल होताच, त्यांना सोमवारी (ता.१८) सकाळी ११ वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभागात चौकशीसाठी उपस्थित राहण्याची नोटीस बजाविण्यात आली आहे. यावेळी चौकशीदरम्यान, बडगुजर यांना अटक होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

सलग तिसऱ्या दिवशी चौकशी

तर, दहशतवादी सलिम कुत्तासमवेत डान्स केल्याप्रकरणी आज सलग तिसऱ्या दिवशी शहर गुन्हे शाखेच्या युनिट एक येथे दोन ते अडीच तास चौकशी करण्यात आली. या चौकशीतही बडगुजर यांच्याकडून तपासी अधिकाऱ्यांना सहकार्य मिळत नसल्याचे समजते.

"तत्कालिन आयुक्तांच्या तक्रारीनुसार उघड चौकशी सुरू होती. त्याचप्रकरणी सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात चौकशीअंती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यासंदर्भात सोमवारी (ता.१८) सकाळी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.'' - शर्मिष्ठा वालावलकर, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक.

Sudhakar Badgujar
Salim Kutta Case: बडगुजरांची 3 तास पुन्हा चौकशी; बडगुजर म्हणतात, तपासात सहकार्य; पोलीस म्हणतात, उत्तरांची टाळाटाळ!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()