Harsha Badgujar
Harsha Badgujar

Sudhakar Badgujar: सलीम कुत्ता प्रकरणावर सुधाकर बडगुजरांच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, तो व्हिडिओ...

मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपींपैकी एक असलेला सलीम कुत्ता हा गँगस्टर सध्या चर्चेत आला आहे.
Published on

नाशिक : मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपींपैकी एक असलेला सलीम कुत्ता हा गँगस्टर सध्या चर्चेत आला आहे. कारण शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नाशिकचे शहरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा एक पार्टीतला व्हिडिओ समोर आला आहे.

यामुळं भाजपनं ठाकरे गटाला टार्गेट केलं आहे. पण यावरुन रंगलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर बडगुजर यांच्या पत्नी हर्षा बडगुजर यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. या व्हिडिओबाबतही त्यांनी शंका उपस्थित केली आहे. (Sudhakar Badgujar wife Harsha Badgujar first reaction said this video clip is fake)

हर्षा बडगुजर यांनी म्हटलं की, "ती क्लीपच खोटी आहे. हा सार्वजनिक कार्यक्रम होता, त्यातला सलीम कुत्ता हा व्यक्ती कोण आहे? आम्हाला माहिती नाही. बडगुजर हे नगरसेवक होते, त्यामुळं त्यांना कार्यक्रमाला कोणीही बोलवू शकतो. अशावेळी बोलावल्यानंतर कार्यक्रमाला जावं तर लागतंच. आशा वेळी त्यानं कोणासोबत थोडं नाचलं-गायलं तर त्यामुळं त्याचा अर्थ असा तर होत नाही ना की दोघेही मिळालेले आहेत" (Latest Marathi News)

Harsha Badgujar
Salim Kutta: "इक्बाल मिर्चीशी कनेक्शन असलेले सोबत बसलेत"; सलिम कुत्ताच्या प्रकरणावरुन काँग्रेसचा भाजपला टोला

आता दादा भुसेंनी काय पाहिलं कदाचित त्यांना संपूर्ण प्रकरण माहिती नव्हतं. डोळ्यानं पाहणं आणि कानानं ऐकण्यात फरक असतो ना? त्यामुळं कोणीतरी आरोप केले आणि त्यांनी ते सांगतलं हे बरोबर नाही. (Marathi Tajya Batmya)

माझा माझ्या पतीवर पूर्ण विश्वास आहे ते असं काही करुच शकत नाहीत. लोक त्यांना चांगले ओळखतात, मी स्वतः ३३ वर्षांपासून त्यांना ओळखते, असे आरोप तर गेल्यावेळी संजय राऊतांवरीही झाले होते. त्यामुळं सर्वांवरील हे आरोप खरेच होते असं होऊ शकत नाही ना?

Harsha Badgujar
Salim Kutta: ठाकरे गटाच्या नेत्यासोबत दिसलेला गँगस्टर सलिम कुत्ता कोण? त्याला 'कुत्ता' ही ओळख कशी पडली?

त्यामुळं यांनी पूर्ण विचार करुन बोललं पाहिजे. माझ्या नवऱ्याला उघड उघड फसवलं जात आहे, हे स्पष्टपणे दिसत आहे. त्यांचा यामागचा हेतू काय आहे? हे मी सांगू शकत नाही. हा व्हिडिओ तर आत्ताचा नाहीए ना? तो कदाचित १५-१६ वर्षांपूर्वीचा असावा, तेव्हा संपूर्ण शिवसेना एकत्रच होती, असंही हर्षा बडगुजर यांनी म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.