Nashik Crime News: अपहरण, बलात्कारप्रकणी रायपूरहून सुफियान ताब्यात; पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल

Officer-employees of Bhadrakali police station while producing the suspect in the court.
Officer-employees of Bhadrakali police station while producing the suspect in the court.esakal
Updated on

जुने नाशिक : अल्पवयीन तरुणीच्या अपहरणप्रकरणी संशयित आणि तरुणी दोघांनाही पोलिसांनी रायपूर येथून ताब्यात घेतले आहे. सुफियान इब्राहिम शेख (२४, रा. मूळ कोपरगाव, सध्या नानावली) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध पोस्को अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Sufiyan arrested from Raipur in kidnapping rape case registered under POC Nashik Crime News)

जुने नाशिक परिसरातील अल्पवयीन तरुणी बेपत्ता झाली होती. ११ सप्टेंबरला भद्रकाली पोलिस ठाण्यात तरुणीच्या कुटुंबियांकडून अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिस तपास करत होते. दरम्यान भद्रकाली पोलिसांनी दोन दिवसापूर्वी द्वारका परिसरातून काही जणांना ताब्यात घेतली होते.

त्यांच्या चौकशीत संशयित आणि अपहरण झालेली तरुणी रायपूर येथे असल्याचे उघड झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक भास्कर गवळी, कर्मचारी शिवाजी कुलकर्णी, उत्तम पवार यांचे पथक रायपूर येथे रवाना करण्यात आले.

त्यांनी तरुणी आणि संशयितास ताब्यात घेतले. दोघांना घेऊन मंगळवार (ता.२७) रात्री पोलिस ठाण्यात दाखल झाले. तरुणीची तसेच संशयितांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पोलिस ठाण्यात दाखल अपहरणाच्या गुन्ह्यात वाढीव कलम लावत पोस्को अर्थात बाल लैंगिक अत्याचार कायदे अंतर्गत संशयिताविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

Officer-employees of Bhadrakali police station while producing the suspect in the court.
Nashik News : सातपूरमध्ये घराला लागली आग अन् संसारपयोगी वस्तु जळून खाक!

तरुणीच्या वडिलांनी तिच्या शोधात संशयिताच्या मूळ गावी कोपरगाव येथे गेले. तरुणीची माहिती देणाऱ्या रोख बक्षीस जाहीर केले होते. तेथील काही तरुणांना दोघांसंदर्भात माहिती होती. त्यांनी द्वारका येथे येऊन तरुणीच्या वडिलांशी संपर्क केला.

बक्षीसाची मागणी करत होते. भद्रकाली पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी द्वारका गाठत त्या तरुणाना चौकशीसाठी हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....ताब्यात घेतले. श्री. पवार यांनी त्यांची सखोल चौकशी केली.

त्यात दोघेही रायपूर येथे असल्याची माहिती उघड झाली. लगेचच त्यांनी रायपूर येथे पथक रवाना केले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. संशयितास न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसांची अर्थात ३० तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तरुणीस तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले.

Officer-employees of Bhadrakali police station while producing the suspect in the court.
Nashik News: मध्यरात्री 3 वाहनांचा विचित्र अपघात; अपघातग्रस्त गाडीत कोट्यावधी रुपयांच्या नोटांची अफवा?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.