Nashik News : नियमित ग्रामपंचायत कर भरणाऱ्या सर्व करदात्यांना २० रुपये प्रतिकिलो दराने साखर उपलब्ध करून देण्याचा निर्णय बोपेगाव ग्रामपंचायतीने घेतला असल्याची माहिती सरपंच वसंतराव कावळे यांनी दिली. (Sugar at Rs 20 per kg for regular taxpayers in sinnar nashik news)
बोपेगाव ता. दिंडोरी येथील ग्रामपंचायत प्रशासनाने नियमित कर भरणा करणाऱ्या सर्व ग्रामस्थांना प्रोत्साहन मिळावे म्हणून यंदा दिवाळीनिमित्त २० रुपये प्रतिकिलो दराने साखर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असून या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे.
या योजनेनुसार ५०० रुपये वार्षिक कर नियमित भरणाऱ्या ग्रामस्थांना प्रत्येकी ५ किलो तर १ हजार पर्यंत वार्षिक कर नियमित भरणाऱ्या ग्रामस्थांना प्रत्येकी १० किलो तर २ हजार पर्यंत वार्षिक नियमित कर भरणाऱ्या ग्रामस्थांना प्रत्येकी १५ किलो व दोन हजार पेक्षा अधिक वार्षिक कर नियमित भरणाऱ्या सर्व ग्रामस्थांना प्रत्येकी २० किलो साखर २० रुपये प्रती किलो दराने उपलब्ध करून दिली जाणार आहे.
यामुळे ग्रामपंचायतीची थकीत कर वसुली होण्यासाठी हातभार लागणार असून नियमित कर भरणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहन मिळणार आहे. या योजनेत सहभागी होऊन जास्तीत जास्त ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच वसंतराव कावळे सरपंच योगेश कावळे, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल कावळे, प्रा. दिलीप गांगुर्डे, काशिनाथ भवर, अनिताताई कावळे, मीराताई कावळे, वैशाली कावळे, योगिता पगार, सुभद्रा भवर, कावेरी भवर, ग्रामविकास अधिकारी श्री. भोजने यांनी केले.
"ग्रामपंचायत आर्थिक दृष्टया सक्षम होणे आवश्यक असून त्याशिवाय गावाचा विकास होणे अवघड आहे. त्यासाठी नागरिकांनी नियमित कर भरण्यासाठी स्वतःहून पुढाकार घ्यावा. यासाठी ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सर्वसामान्य करदाते यांना कर भरण्यासाठी प्रोत्साहन मिळणार असून त्यांची दिवाळी गोड होणार आहे." - वसंतराव कावळे, सरपंच बोपेगाव
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.