Nashik News: 'अरे खोप्यामधी खोपा...’ची ग्रामिण भागात येतेय प्रचिती! सुगरण पक्ष्यांची पावसाळ्याची तयारी सुरू

Sugaran bird skulls found on a leaning tree in a well in the area.
Sugaran bird skulls found on a leaning tree in a well in the area.esakal
Updated on

Nashik News : पावसापासून संरक्षण मिळण्यासाठी सर्व पक्षी घरटी तयार करतात. यात सर्वाधिक आकर्षक घरटे असते ते सुगरणीचे. मोठ्या कष्टातून आखीव व रेखीव कामातून पिल्लांसाठी तयार केलेले खोपे आकर्षण ठरत आहेत.

कवी बहिणाबाई चौधरी म्हणतात, ‘अरे खोप्यामधी खोपा, सुगरणीचा चांगला’ या ओळीची प्रचिती या खोप्यांकडे पाहून येत आहे. (Sugaran birds preparing nest for rainy season at rural areas nashik news)

पक्ष्यांना पावसाळ्यात, हिवाळ्यात उबदार घरट्यांची गरज असते. ग्रामीण भागात उंच बाभळी, लिंब व बोरीच्या झाडावर दिसणारे सुगरिणीचे सुंदर घरटे वाढत्या शहरीकरणामुळे नामशेष होत आहेत.

विज्ञान युगात प्रगती केलेल्या मानवाला हाताने अथवा यंत्राच्या साहाय्यानेही सुगरिणीच्या घरट्यासारखी वीण करता येणे अशक्य असते. त्यामुळे आता मानवानेदेखील आपल्या घराच्या सजावटीत या खोप्यांचा वापर करण्यास सुरवात केली आहे.

अशी असते रचना

काटेरी झाडांच्या फांदीला असलेले पक्ष्यांचे घरटे साधारणतः दीड ते दोन फूट उंचीचे असते. घरट्याच्या तळाशी प्रवेश करण्यासाठी जागा असते. आतमध्ये सहा ते आठ फूट इंच उंचावर गेल्यानंतर गोलाकार भागात अंडी घालण्यासाठी खोलगट भाग असतो.

त्याच ठिकाणी पिल्ले जन्माला येतात. खोलगट भागामुळे पिल्लांना उडता येईपर्यंत बाहेर पडता येत नाही. गवत काडीपासून तयार केलेला सुगरणीचा खोपा म्हणजे वीणकामांचा अद्वितीय नमुनाच असतो.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Sugaran bird skulls found on a leaning tree in a well in the area.
Sakal Impact : शहर पोलिसांकडून धूम्रपान करणाऱ्याविरुद्ध कारवाईचा बडगा

दुर्मिळ कला होतेय नामशेष

साधारण जूनमध्ये सुगरण पक्षी घरटे तयार करतात. मध्यम, लहान आकाराचे, थव्यांनी राहणारे, लालसर पिवळ्या रंगाचे सुगरण व वीणकर पक्षी आखूड, जाडसर व टोकदार चोचीचे, तसेच लहान पायाचे असतात.

धान्य, फळे हे त्यांचे प्रमुख अन्न आहे. सद्यस्थितीत शेतशिवार हिरवाईने नटलेले आहे. ग्रामीण व शहरातील अनेक झाडांवर तयार केलेले हे खोपे पाहण्यासाठी चिमुकले व नागरिक गर्दी करीत आहेत.

पक्ष्यांनी तयार केलेल्या या घरकुलाकडे कौतुकाने पाहत आहेत. दरम्यान, ग्रामीण भागासह शहरातील वाढत्या सिमेंटच्या जंगलामुळे सुगरण व वीणकर पक्षी स्थलांतर करू लागले आहेत.

शेत शिवारात दिसून येणारी सुंदर घरटी काही जण झाडांवरून काढून घराच्या सजावटीसाठी वापरत आहेत. मानवाच्या या अतिक्रमणामुळे निसर्गातील असामान्य दुर्मीळ कला कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पाणथळ जागेची निवड

सुगरण पक्षी घरटे तयार करण्यासाठी विशेषत: पाणथळ ठिकाणची निवड करतो. नदी काठ, विहीरी, नाले आणि बंधाऱ्याशेजारील झाडांवर अशी घरटी प्रामुख्याने दिसून येतात.

Sugaran bird skulls found on a leaning tree in a well in the area.
Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशीनिमित्त मनमाड आगारातर्फे रोज बसेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.