लखमापूर (जि. नाशिक) : महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे एकाच वर्षात दोनवेळा येथील नितीन हरी बच्छाव यांच्या शेतातील दोन एकर उस (Sugarcane) जळून खाक झाला. या घटनेत ठिबक सिंचन संचाचेही नुकसान झाले. थकबाकीसाठी जाचक वसुली मोहिम राबविणाऱ्या महावितरणला (Mahavitaran) शेतकऱ्याच्या नुकसानीचे सोयरसुतक नाही का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
मार्च २०२१ रोजी नितीन हरी बच्छाव यांच्या लखमापूर शिवारातील गट नंबर ७३७ मधील क्षेत्रात निकामी झालेल्या वीज वाहिन्यांमध्ये शॉर्टसर्किट (Short circuit) होऊन दोन एकरातील उस व ठिबक सिंचनाचे ( Drip irrigation) दोन लाखांचे नुकसान झाले. महसूल विभागाने (Revenue Department) पंचनामा केला. परंतु, एवढे नुकसान होऊनही एक रुपयाही भरपाई मिळाली नाही. घटनेला कारणीभूत ठरलेल्या सदोष वीज वाहिन्या व निकामी झालेल्या रोहित्रच्या पॅनलची दुरुस्ती करण्याची तसदी महावितरण कंपनीने घेतली नाही. अशीच परिस्थिती असताना वर्षभरानंतर म्हणजे २४ फेब्रुवारी २०२२ रोजी उसतोड सुरू असताना दुपारी एकला पुन्हा शॉर्टसर्किटमुळे आग लागून नवीन ठिबक संचासह व उस जळून खाक झाला. तलाठी जी. बी. सूर्यवंशी यांनी पंचनामा केला. दोनवेळा नुकसान होऊनही महावितरण कंपनी कुठलेच पाऊल उचलत नसल्याची खंत शेतकऱ्याने व्यक्त केली. एकाच वर्षात दोनवेळा शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीमुळे श्री. बच्छाव यांचे चार लाखाहून अधिक रूपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानीची तत्काळ भरपाई मिळावी, अशी मागणी नितीन बच्छाव यांनी केली आहे.
"मागीलवर्षी मार्च महिन्यात जळालेल्या ऊस, ठिबक संचाचा पंचनामा करून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला आहे. यावर्षी लागलेल्या आगीच्या घटनेची महावितरण कंपनीकडे शेतकऱ्याने नोंद केलेली नाही. नवीन रोहित्र टाकून लोड कमी करण्याचे काम सुरू होणार आहे."
- भाऊलाल नागरे, सहाय्यक अभियंता, लखमापूर
"मागीलवर्षी मार्च महिन्यात तोडणीवर आलेल्या उसाचे एक लाख ८० हजार रुपयांचे नुकसान झाले. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात तोडणी सुरू असताना शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यावेळी नवीन ठिबक संचासह काही उसाचे जळून नुकसान झाले. एवढे नुकसान होऊनही ना महसूल विभाग, ना महावितरण कंपनीने एक रुपया भरपाई दिली."
- नितीन बच्छाव, शेतकरी, लखमापूर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.