Nashik News: राघोजी भांगरेंच्या स्मारकाचा फेरप्रस्ताव पाठविण्यात यावा; मुख्यमंत्र्यांच्या जिल्हा प्रशासनाला सूचना

Nashik News: राघोजी भांगरेंच्या स्मारकाचा फेरप्रस्ताव पाठविण्यात यावा; मुख्यमंत्र्यांच्या जिल्हा प्रशासनाला सूचना
Updated on

Nashik News : आद्यक्रांतिकारक (स्व.) राघोजी भांगरे यांचे सोनोशी (ता. इगतपुरी) या त्यांच्या जन्मगावी भव्य स्मारक व्हावे, यासाठी परिपूर्ण असा फेरप्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी (ता. १२) जिल्हा प्रशासनाला दिले.

या स्मारकासाठी ३० कोटींचा प्रस्ताव प्रशासनाने पाठविला होता. मात्र तांत्रिक समितीने केवळ १३ कोटींच्या प्रस्तावालाच मान्यता दिली. यात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून फेरप्रस्तावाच्या सूचना दिल्या. (suggestion by cm to district administration re proposal of Raghoji Bhangre memorial should be sent nashik news)

मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत गुरुवारी मुंबईत झालेल्या बैठकीत यावर चर्चा झाली. मुख्यमंत्री कार्यालयाचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव खारगे, ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव विजय सौरभ आदी उपस्थित होते.

स्व. राघोजी भांगरे यांचे सोनोशी येथे भव्य स्मारक व्हावे, यासाठी अनेक आदिवासी बांधवांच्या संघटनांकडून खासदार हेमंत गोडसे, आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडे मागणी होती. शासनाने स्मारकासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. प्रशासनाने सहा महिन्यांपूर्वी ३० कोटींचा प्रस्ताव सादर केला होता.

Nashik News: राघोजी भांगरेंच्या स्मारकाचा फेरप्रस्ताव पाठविण्यात यावा; मुख्यमंत्र्यांच्या जिल्हा प्रशासनाला सूचना
YCMOU News : ‘मुक्त’च्या गुणपत्रिकेच्या पॅटर्न पोचणार राज्यभर; राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून विविध सूचना

वासळी येथेही स्व. भांगरे यांचे स्मारक व्हावे, यासाठी आमदार कोकाटे प्रयत्नशील आहेत. ग्रामविकास विभागाने हा प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसाठी मंत्रालयात पाठवला होता. त्या वेळी ३० कोटींऐवजी १३ कोटींचा खर्च ग्राह्य ठरविण्यात आला.

स्मारक उभारणीच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्यासाठी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. सुरवातीला मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्लीत असलेल्या खासदार हेमंत गोडसे यांच्याशी मोबाईलवरून संवाद साधला.

खासदार गोडसे यांनी आदिवासी बांधवांची अस्मिता असून, सोनोशी येथे भांगरे यांचे स्मारक होणे गरजेचे आहे. काही जमीन शासनाच्या ताब्यात असून, काही संपादित करण्याची गरज असल्याचे व्हीसीद्वारे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. प्रस्तावातील रक्कम आणि तांत्रिक मान्यतेची रक्कम यात मोठी तफावत असल्याने फेरप्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

Nashik News: राघोजी भांगरेंच्या स्मारकाचा फेरप्रस्ताव पाठविण्यात यावा; मुख्यमंत्र्यांच्या जिल्हा प्रशासनाला सूचना
Governor Ramesh Bais : उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची प्रगती निश्‍चित : राज्यपाल रमेश बैस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.