Nashik Crime : अत्याचारातील संशयिताचा आत्महत्येचा प्रयत्न

Crime News
Crime Newsesakal
Updated on

Nashik Crime News : सिन्नर पोलिस ठाण्यात अत्याचाराच्या गुन्ह्यासंदर्भात चौकशीसाठी आणलेल्या संशयिताने पोलिस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.

जखमी संशयितावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, सिन्नर पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात पोक्सो अन्वये अत्याचाराचा गुन्हा दाखल आहे. (Suicide attempt by abuse suspect nashik crime news)

जितेंद्र गुलामजी तोरोले (रा. खडकीवन, जि. बिडवणी, मध्य प्रदेश. हल्ली रा. सिन्नर) असे संशयिताचे नाव आहे. पोलिस उपनिरीक्षक सचिन लहामगे यांच्या फिर्यादीनुसार सिन्नर सामान्य रुग्णालयात साडेबारा वर्षांची अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याने दाखल होती. याबाबत उपनिरीक्षक लांबी तपास करीत असताना संशयित जितेंद्र हा एका ठिकाणी काम करत होता.

पोलिसांनी त्याचा सुपरवायझर अन्सारी व संशयित जितेंद्र यास दुपारी पोलिस ठाण्यात आणले. पोलिस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर संशयित जितेंद्र यांच्याकडे चौकशी सुरू होती. त्या वेळी जितेंद्र पाणी पिण्यासाठी कक्षाच्या बाहेर आला. त्याने पहिल्या मजल्यावरून उडी घेतली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Crime News
Mumbai Crime : पत्नी शिडीवरुन पडल्याचा बनाव; पतीनेच केली गळा आवळून हत्या

जखमी जितेंद्र याला पोलिसांनी सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालयात अधिक उचारासाठी दाखल केले आहे, त्याचे प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यामध्ये संशयित जितेंद्र याच्या विरोधात पोक्सो अन्वये अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, संशयित जितेंद्र याची चौकशी सुरू असताना त्याने बाहेर येऊन आत्महत्येचा प्रयत्न कसा केला, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. चौकशीवेळी पोलिस हजर नव्हते का, असाही प्रश्न यानिमित्ताने समोर येत आहे. पोलिसांच्या हलगर्जीमुळेच संशयिताने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, असे बोलले जात आहे.

Crime News
Nagpur Crime: लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.