फार्मा कंपनीतील प्रतिनिधीची आत्महत्या; नेमके कारण काय?

suicide employee
suicide employeeesakal
Updated on

म्हसरूळ (जि.नाशिक) : मखमलाबाद येथील विकास नरेंद्र झोमन (वय ३०) या तरुणाने शनिवारी (ता.२९) सायंकाळी घरी गळफास घेत आत्महत्या केली. तो एका फार्मा कंपनीचा एक्झिक्युटिव्ह होता. (Suicide-of-representative-of-pharma-company-nashik-marathi-news)

suicide employee
VIDEO : मोदी सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी - महसूलमंत्री थोरात

वरिष्ठांकडून मानसिक छळ

फार्मा कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला काही उद्दिष्टे दिली होती. तसेच त्याचा मानसिक छळ सुरू होता. यातून त्याने आत्महत्या केली असल्याचा आरोप मृत विकासच्या कुटुंबाने केला आहे. दरम्यान, त्याचा छळ करणाऱ्या कंपनीतील संशयितांची चौकशी करून त्यांना अटक करावी, गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. मृत विकासचा भाऊ आकाश झोमन याने म्हसरूळ पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. मृत विकासच्या मागे पत्नी, मुलगा, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, या संदर्भात वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांनी सांगितले, की मृत विकास यांच्या कुटुंबीयांनी केलेला तक्रार अर्ज घेण्यात आला आहे. या प्रकरणी फार्मा कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्याची चौकशी केली जाईल. चौकशीअंती योग्य ती कायदेशीर कारवाई होईल.

suicide employee
नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाचे वेध

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.