Nashik Crime News : जाचाला तरुणाची आत्महत्या; 7 जणांविरूद्ध गुन्हा दाखल

death
death esakal
Updated on

Nashik Crime News : झाडी (ता. मालेगाव) येथील तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी सात जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (suicide of young man Crime against 7 persons nashik crime news)

उसनवार दिलेले पैसे देण्यासाठी टाळाटाळ करतानाच घरातील सोने व रोख रक्कम चोरुन नेल्याने संशयितांच्या त्रासाला कंटाळून कमलाकर शशिकांत वाघ (वय ३३) याने राहत्या घराच्या छताला दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी मयत कमलाकरचे वडील शशिकांत वाघ (वय ६४) यांनी तक्रार दिली.

त्यांच्या तक्रारीनुसार त्यांच्या शेतातील पाइपलाइन राजेंद्र चव्हाण याने संशयित संजय चव्हाण, बालाजी चव्हाण (रा. शिरसोंडी), नारायण वाघ, मोठाभाऊ वाघ (दोघे रा. झाडी), गोरख निकम (रा. मांजरे) यांच्या मदतीने तोडून टाकली होती. संशयितांपैकी मोठाभाऊ वाघ व गोरख निकम यांनी मयत कमलाकर याच्याकडून उसनवार पैसे घेतले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

death
Crime News : ड्रममध्ये कोंडून ४ पोटच्या लेकरांची केली हत्या अन् स्वतःही घेतला गळफास; कारण...

ते पैसे देण्यास त्यांनी कमलाकर यास नकार दिला. याशिवाय संशयित यांनी कमलाकर याच्या घरातील तीन लाख चाळीस हजार रुपये रोख, व २० हजार रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज चोरुन नेला.

संशतियातांकडून होत असलेल्या सततच्या जाचाला कंटाळून कमलाकरने घराच्या छताला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. २८ जानेवारी ते २३ फेब्रुवारी दरम्यान संशयितांनी वारंवार छळ केला. प्रारंभी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

घटना घडल्यानंतर अपर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती व तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक मोहित मोरे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. मयताच्या वडिलांनी तक्रार दिल्यानंतर तालुका पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

death
Kolhapur Crime : 'त्याला मारला नसता तर त्यानं आम्हाला मारलं असतं'; खुनी हल्ला प्रकरणी सहा जणांना अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.