Nashik Crime News : शहरातील दरेगाव येथील विकास जिभाऊ उशिरे या तरुणाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.
येथील बांधकाम व्यावसायिक आरिफ शाह याने फसवणूक केल्याने व विकासने बिल्डींग मटेरिअल सप्लायर होण्यासाठी दिलेले पैसे देण्यास आरिफने टाळाटाळ केल्याने त्याने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. (Suicide of youth in Daregaon Crime against construction worker nashik crime news)
दरम्यान या प्रकरणी आझादनगर पोलिस ठाण्यात आरिफ शाह व फारुक (पूर्ण नाव समजू शकले नाही) या दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा, फसवणुकीचा व जातिवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरिफने पूर्व भागात घरकुल बांधण्याची मोठी योजना जाहीर केली होती.
या योजनेत बिल्डींग मटेरिअल सप्लायर होण्यासाठी त्याने विकास उशिरे व राधेश्याम दरेकर यांच्याकडून धनादेश व रोख स्वरूपात २०१८ मध्ये वीस लाख रुपये घेतले होते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
तसेच विकासने सुमारे पाच लाखाचे बिल्डींग मटेरिअलही आरिफला दिले होते. सप्लायर होण्यासाठी व बिल्डींग साहित्याचे पैसे मागण्यासाठी विकासने तगादा सुरु केला.
आरिफ सातत्याने पैसे टाळाटाळ करू लागल्याने फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. या वादातूनच त्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्येनंतर कुटुंबीयांनी संशयितांवर कारवाई व गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली. आझादनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.