Summer Effects on Poultry : उष्णतेने कोंबड्या मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण वाढले

poultry
poultryesakal
Updated on

Summer Effects on Poultry : उन्हाच्या झळा वाढू लागल्याने व बॉयलर कोंबडीच्या अंगी असणारी उष्णता याचा फटका पोल्ट्री व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात बसू लागला आहे.

उष्माघाताने कोंबड्या मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण वाढल्याने पोल्ट्री व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहे. (Summer Effects on Poultry heat increased death rate of chickens nashik news)

poultry
Nashik News : शहर विकास आराखडा कागदावरच; अति झाले रावचे अन् पोट फुगले गावचे!

उष्ण वातावरण नियंत्रित करण्यासाठी पोल्ट्री शेडवर ठिबक सिंचन तसेच पाण्याच्या प्लॅस्टीक टाक्यांना बारदान लावून पाणी थंड ठेवण्याचा प्रयत्न पोल्ट्री चालक करत आहे. सध्या उन्हामुळे कोंबड्यांची मर वाढू लागली असून यावर उपाय म्हणून पोल्ट्री व्यावसायिक पोल्ट्री शेडवर पाचट टाकून तसेच त्यावर ठिबकद्वारे पाणी सोडत आहेत.

तसेच आजूबाजूने हिरवी नेट बांधून पोल्ट्री शेडमधील वातावरण नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोल्ट्री शेडवरील सिमेंट पत्रे थंड राहतील याची काळजी घेत आहेत.पत्राच्या आतील बाजूनेही तुषार सिंचन केले जात आहे.

poultry
Gram Panchayat Bypoll Election: ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत 70 टक्के मतदान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.