Onion Rates Hike: उन्हाळ कांद्याचे भाव चढ-उतारासह तेजीच्या दिशेने जाण्याची शक्यता!

पाकच्या गैरहजेरीमुळे भावात ५० ते २०० रुपयांनी वाढ
onion rates
onion ratesesakal
Updated on

Onion Rates Hike : पाकिस्तानमधील व्यापाऱ्यांनी बकरी ईदची सुटी घेतल्याने जागतिक बाजारपेठेत भारतीय कांद्याची मागणी वाढली. त्यामुळे कांद्याचे आगार असलेल्या पिंपळगाव बसवंत व लासलगावमध्ये उन्हाळ कांद्याच्या भावातील वाढीचा आलेख उंचावत निघाला होता.

जुलैमध्ये पाकिस्तानच्या कांद्याची आवक सुरु होईल. त्यानंतर कांद्याच्या भावात चढ-उतार राहतील. मात्र, कांद्याचे भाव तेजीच्या दिशेने जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. (Summer onion prices go higher with fluctuations absence of Pakistan price increase by 50 to 200 rupees nashik)

स्थानिक बाजारपेठेतील आवक आणि देशांतर्गत व निर्यातीसाठीच्या कांद्याच्या मागणीतून सर्वसाधारणपणे ३ जुलैपासून भावाची दिशा स्पष्ट होण्यास मदत होईल, असे निर्यातदार सांगताहेत. दरम्यान, २४ तासात स्थानिक बाजारपेठेतील कांद्याचे सरासरी भाव क्विंटलला ५० ते २०० रुपयांनी वाढले आहेत.

बाजारपेठेतील कांद्याचा आजचा क्विंटलचा सरासरी भाव (रुपयांमध्ये) असा (कंसात २७ जूनचा भाव) : कोल्हापूर- १ हजार (१ हजार), मुंबई- १ हजार २०० (एक हजार), खेड-चाकण- १ हजार २०० (१ हजार), लासलगाव- १ हजार २५० (१ हजार २०१), मुंगसे- १ हजार १०५ (१ हजार १३५), कळवण- १ हजार (९००), चांदवड- १ हजार १५० (१ हजार १५०), मनमाड- १ हजार २०० (१ हजार १००), देवळा- १ हजार २०० (१ हजार १००), पिंपळगाव बसवंत- १ हजार २५० (१ हजार १५०).

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

onion rates
Onion Subsidy: जूनपर्यंत विकलेल्या सर्व कांद्याला अनुदान द्या : डॉ. जयंत पवार

बांगलादेशसाठी ‘लोडींग' सुरु

बांगलादेशमध्ये बकरी ईदची सुटी असल्याने कांद्याची निर्यात थांबली होती. मात्र, बकरी ईदची सुटी संपल्याने आयात सुरु होणार असल्याने बांगलादेशसाठी उन्हाळ कांदा ट्रकमध्ये भरण्यास व्यापाऱ्यांनी सुरवात केली आहे.

त्याचबरोबर निर्यातीसाठी व्यापाऱ्यांची खरेदी सुरु आहे, नाफेडतर्फे खरेदीला वेग आला आहे. त्याचे पडसाद स्थानिक बाजारपेठेतील भावावर उमटले असून, भावात वृद्धी झाली आहे. दक्षिण भारतामध्ये नवीन कांद्याची लागवड २० ते ३० टक्के झाली आहे.

परतीचा मॉन्सून कांद्याचे नुकसान करत असल्याचा अनुभव जमेस असल्याने दक्षिण भारतातील शेतकऱ्यांनी कांद्याच्या लागवडीसाठी अंदाज घेण्यास सुरवात केली आहे.

लासलगावमधील कांद्याची स्थिती (आकडेवारी जूनमधील आहे)

* २०१९-२० : आवक- ४ लाख ६१ हजार ३८९ क्विंटल (भाव : किमान ४००- कमाल १ हजार ४५०-सरासरी १ हजार २२१)

* २०२०-२१ : आवक-६ लाख ८९ हजार ३४१ क्विंटल (भाव : किमान ३००- कमाल १ हजार १९०- सरासरी ८०२)

* २०२१-२२ : आवक- ९ लाख २६ हजार ५१ क्विंटल ( भाव : किमान ५००- कमाल २ हजार ४००- सरासरी १ हजार ८१३)

* २०२२-२३ (१ ते २८ जूनपर्यंत) : आवक- ८ लाख २४ हजार ३४६ क्विंटल (भाव : किमान ३००- कमाल २ हजार ३६०- सरासरी ९९४)

onion rates
Telangana Onion Rate: BRS नेत्यांच्या दाव्याची शेतकऱ्याकडून पोलखोल! कांदा लिलाव व दराची मांडली कैफियत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.