Nashik Onion Rate : उन्हाळ कांदा भावात दिवसात 100 ते 200 रुपयांनी वाढ; ‘नाफेड’ खरेदी अन बांगलादेशची मागणी

Onion
Onion esakal
Updated on

Nashik Onion Rate : कांद्याच्या आगारात जिल्ह्यातील बाजारपेठेत एका दिवसामध्ये उन्हाळ कांद्याच्या भावात १०० ते २०० रुपयांनी वाढ झाली.

बहुतांश बाजार समित्यांमध्ये क्विंटलला १५० रुपये अधिकचा भाव गुरुवारी (ता. ५) बुधवारच्या (ता. ४) तुलनेत मिळाला. ‘नाफेड’ ची खरेदी आणि बांगलादेशसह देशांतर्गत असलेल्या मागणीमुळे भाव उंचावण्याच्या ‘ट्रेंड’ राहिल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. (Summer onion prices increase by Rs 100 to Rs 200 per day nashik onion rate news)

केंद्र सरकारने आतापर्यंत ७ लाख टन कांदा खरेदी थेट शेतकऱ्यांकडून करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र पूर्वीच्या पाच लाख टनापैकी ५० हजार क्विंटल कांद्याची खरेदी कमी असताना आता आणखी २ लाख टन कांद्याची खरेदी करण्याच्या अनुषंगाने ‘नाफेड’ ने खरेदीकडे लक्ष केंद्रित केल्याचे चित्र बाजारात दिसत आहे.

त्याचवेळी कांदा व्यापाऱ्यांनी लिलावात भाग न घेतल्याने उपलब्ध कांद्याचे प्रमाण कमी झाले होते. या सर्व बाबींमुळे आता उन्हाळ कांद्याच्या भावातील वाढीस सुरवात झाल्याचे स्पष्ट होत आहे. कोल्हापूरमध्ये बुधवारप्रमाणे आजही १ हजार ८००, तर मुंबई बाजार समितीत १ हजार ७०० रुपये क्विंटल असा सरासरी भाव राहिला. जिल्ह्यातील मुंगसेमध्ये २ हजार १५०, येवल्यात आणि उमराणेमध्ये १ हजार ९००, कळवणमध्ये २ हजार १५०, चांदवडमध्ये २ हजार १०० रुपये क्विंटल या सरासरी भावाने आज कांद्याची विक्री झाली.

Onion
Nashik Onion Auction: लासलगावला कांद्याला 2050 रुपये सरासरी भाव! बाजार समितीत कांदा लिलाव सुरू

कांद्याच्या भावाची स्थिती

(आकडे क्विंटलला सरासरी रुपयांमध्ये)

बाजार समिती गुरुवारी (ता. ५) बुधवारी (ता. ४)

लासलगाव २ हजार २०० २ हजार ५०

विंचूर २ हजार २५० २ हजार ५०

नायगाव २ हजार १५० २ हजार

मनमाड २ हजार १ हजार ९००

पिंपळगाव २ हजार ३५० २ हजार २००

देवळा २ हजार १५० २ हजार ५०

Onion
Nashik Onion News : व्यापाऱ्यांच्‍या ‘बंद’ने सरकारचे वाचले 250 कोटी; निर्यातीने व्यापारी मालामाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.