Summer Health Precaution : सध्या उन्हाच्या तीव्र झळांमुळे नाशिककर बेजार झालेले आहेत. सध्याच्या वातावरणात निष्काळजीपणा जिवावर बेतू शकतो. त्यामुळे तप्त उन्हापासून बचाव करताना आजारपण दूर ठेवण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो आहे.
तापमानात वाढ झालेली असून, आरोग्याचे प्रश्न बळावले आहेत. अशा परिस्थितीत आहारातही आवश्यक बदल करताना, हलका व सहज पचेल असे आहार सेवन करण्यास सांगितले जाते आहे. (Summer Precaution Protect from sun keep diseases away Rising mercury exacerbated health problems nashik news)
यंदाच्या उन्हाळी हंगामात नुकताच ४० अंश सेल्सिअसपर्यंत उच्चांकी तापमान गाठले आहे. उन्हाच्या तडाख्याचा जनजीवनावर परिणाम होताना दिसतो आहे. अशा परिस्थितीत काळजी न घेतल्यास आरोग्याचे गंभीर प्रश्न उद्भवू शकतात.
त्यामुळे उन्हापासून बचावासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचा सल्ला जाणकारांकडून दिला जातो आहे. पुढील पंधरा दिवस काळजीचे असून, थेट सूर्यकिरणांच्या संपर्कात येणे टाळण्याचे आवाहन केले जाते आहे.
अशी घ्या आरोग्याची काळजी..
* ताजे व हलक्या पदार्थांचे सेवन करा.
* दिवसभरात भरपूर पाणी प्या, फळांचा रस, ज्यूस घ्या.
* लस्सी, ताक, मठ्याचा आहारात समावेश करा.
* घराबाहेर पडताना टोपी, उपरणे, स्कार्पचा आधार घ्या.
* पुरेशी झोप घ्या, थेट पंख्या खाली झोपू नका.
* रात्री उशिरापर्यंतचे जागरण टाळावे, सकाळी लवकर उठावे
* उन्हाळ्यात भरपूर घाम येत असल्याने हलके व्यायाम करा
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
या गोष्टीही लक्षात ठेवा..
* भर दुपारी उन्हात जाण्याचे टाळा
* बर्फ किंवा अतिथंड पाण्याचे सेवन टाळा.
* शिळे अन्न पदार्थ खाऊ नका.
* उघड्यावरील पदार्थांचे सेवन करू नका.
* शक्यतो अंडी, मांसाहार टाळा, किंवा कमी प्रमाणात खा.
* आरोग्याची तक्रार अंगावर न काढता डॉक्टरांचा सल्ला घ्या
* सर्दी-पडसे-खोकल्यावर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार घ्या
"शक्यतो उन्हाच्या वेळी घराबाहेरील कामे टाळावीत. अपरिहार्य कारणास्तव बाहेर पडावे लागत असेल तर आवश्यक खबरदारी घ्यावी.
दिवसभरात पाण्यासह लिंबूपाणी, नारळपाणी, कोकम सरबत, मोसंबी किंवा संत्र्याचा रस आदी पेय घ्यावेत.
बर्फाचा वापर केलेले किंवा उघड्यावरील बाहेरील ज्यूस, थंडपेयाचे सेवन टाळावे. चक्कर येणे, अस्वस्थ वाटत असल्यास नजीकच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा." - डॉ. शिरीष देशपांडे, ज्येष्ठ फिजिशियन.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.